Congress On Lok Sabha Election : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? काँग्रेसची निवडणुकांसाठी रणनीती तयार...

Congress Seat Allocation Formula For Loksabha : कोणत्या राज्यात लोकसभेच्या किती जागा ? काँग्रेसला फॉर्म्युला ठरणार ?
Congress Seat Allocation Formula For Loksabha
Congress Seat Allocation Formula For Loksabha Sarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज शनिवारपासून (दि. १६ सप्टेंबर) तीनदिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासाठीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या तेलंगण विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यावर भर असणार आहे. (Latest Marathi News)

या वेळी काँग्रेसच्या या तीनदिवसीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासोबतच नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. तेलंगणमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांबाबत तयारीची आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभेसाठीच्या काँग्रेसच्या उमेदवारीची यादी तयार आहे. त्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Congress Seat Allocation Formula For Loksabha
Congress Vs BJP : काँग्रेसच्या नेत्याने उधळली पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने; म्हणाले, 'ते कधीही भेदभाव...'

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे या बैठकीत काँग्रेसकडून कुठल्या राज्यात किती जागांची मागणी करायची याबाबतचा निर्णय होणार आहे. त्यासोबतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीनदिवसीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Congress Seat Allocation Formula For Loksabha
Eknath Khadse On Fadnavis : 'फडणवीसांना मीच घडवलं, माझ्यामुळेच ते मुख्यमंत्री' ; नाथाभाऊंनी सगळंच काढलं !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com