Manipur Violence News : मणिपूर हिंसाचारामागे परकीय शक्तींचा हात? माजी लष्करप्रमुखांचा संशय

MM Naravane News : गेल्या आठवड्यात व्हायरल झालेल्या 'त्या' व्हिडिओमुळे तर संपूर्ण देश सुन्न झाला.
Manipur Violence News :
Manipur Violence News :Sarkarnama
Published on
Updated on

Manipur Violence News : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात व्हायरल झालेल्या 'त्या' व्हिडिओमुळे तर संपूर्ण देश सुन्न झाला. या हिंसाचाराचे पडसाद संसदेपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत उमटू लागले. केंद्र शासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी होत असतानाच देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी मणिपूर हिंसाचारात विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

माजी लष्करप्रमुख दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिप्रेक्ष्यांवर चर्चेदरम्यान मणिपूर हिंसाचाराप्रकरणी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय माजी लष्करप्रमुख (निवृत्त) मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे या घटनेला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील बंडखोर संघटनांना चीनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचाही त्यांनी उल्लेख केला.

Manipur Violence News :
Municipal elections : महापालिका निवडणुका आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरच?

मणिपूरमध्ये फार पूर्वीपासून अंमली पदार्थांची तस्करी होत आहे आणि गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. गोल्डन ट्रँगलपासून (थायलंड, म्यानमार आणि लाओसच्या सीमा जिथे मिळतात ते क्षेत्र) पासून आपण थोड्याच अंतरावर आहोत. म्यानमारमध्ये नेहमीच अव्यवस्था आणि लष्करी राजवट राहिली आहे.त्यामुळे तिथे अमली पदार्थांची तस्करी नेहमीच होत असते.

जेव्हा आपण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलतो तेव्हा आपण अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांकडेही लक्ष दिले पाहिजे.देशाची सुरक्षा ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली भूमिका बजावली पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ बाह्य सुरक्षेपेक्षा अधिक आहे, तिचे अनेक पैलू आहेत .राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच देशाची अन्न, ऊर्जा आणि आरोग्य या सुरक्षाही महत्त्वाच्या आहे. जर आपल्याकडे निरोगी लोक नसतील तर, सशस्त्र दलांसाठी मनुष्यबळ कुठून येणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com