Chandrababu Naidu Arrested: चंद्राबाबू नायडूंची हायकोर्टात धाव; बेल की पुन्हा जेल ? बुधवारी होणार फैसला

Andhra Pradesh Politics : आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Chandrababu Naidu
Chandrababu Naidu Sarkarnama

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास गैरव्यवहार प्रकरणी शनिवारी पहाटे 'सीआयडी'ने अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आता चंद्राबाबू नायडू यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून बुधवारी हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. चंद्राबाबू नायडू यांना बेल होणार की पुन्हा जेल याचा फैसला बुधवारी सकाळी होणार असून कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chandrababu Naidu
Nana Patole News : गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप भाजपने केले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

चंद्राबाबू नायडू यांनी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यामध्ये राज्य सरकारचे तब्बल 300 कोटींचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील 'सीआयडी'कडून अटक करण्यात आली आहे.

चंद्राबाबू नायडू सध्या तुरुंगात असून आता त्यांना हायकोर्ट जामीन देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी मात्र, त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावरूनच सध्या आंध्र प्रदेशमध्ये राजकारण चांगलच तापलं आहे.

Edited by - Ganesh Thombare

Chandrababu Naidu
Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com