Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

CID News : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पिता-पुत्रावर ही कारवाई केली आहे.
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama

Andhra Pradesh Politics : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा नारा लोकेश यालाही अटक केली आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पिता-पुत्रावर ही कारवाई केली आहे.

नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे. त्यांचा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे.

Chandrababu Naidu
NCP Split News : मोठी बातमी : राष्ट्रवादी कुणाची ? अजितदादा गटाचे सगळे दावे फेटाळले ; शरद पवार गटाकडून उत्तर दाखल..

तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे शुक्रवारी नंदयाला जिल्ह्यात बनगनपल्ली येथे एका जाहीर सभेत भाषण झाले. त्यानंतर ते आपल्या कारमध्ये आराम करीत असताना सीआयडीचे अधिकारी त्यांच्या कारजवळ पोहचले, त्यावेळी नायडू यांच्या कारला कार्यकर्त्यांनी मानवीसाखळी केली होती. सीआयडी पथकाला ते विरोध करीत होते. सीआयडीच्या पथकासोबत त्यांचा जोरदार वाद झाला.

Chandrababu Naidu
Gopichand Padalkar News : पडळकर विखेंना म्हणाले, 'भंडाऱ्याला आशीर्वाद समजा' ; आंदोलकांनी त्याचा वापर...

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चंद्राबाबू नायडू हे कारच्या बाहेर आले. त्यांनी सीआयडी आणि पोलिसांची चर्चा केली. सीआयडीच्या पथकाने त्यांना अटकेची नोटीस दिली. नायडू यांनी याबाबत सविस्तर माहिती मागितली. पण त्यांना माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com