खर्गेंमुळे काँग्रेसला चांगले दिवस येतील? सर्वेतील आकडेवारी भाजपची डोकेदुखी वाढवणारी

काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबरला पदभार स्वीकारणार आहेत.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबरला पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेस पक्षाला अनेक वर्षानंतर गांधी घराण्या बाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यामुळे आता तरी काँग्रेसला चांगले दिवस येणार का, असा सवाल विचारला जात आहे. खर्गे यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्यापासून ते सर्व राज्यांमध्ये नव्याने संघटना बांधणी करण्याचे आव्हान असणार आहे.

खर्गे (Mallikarjun Kharge) नवीन अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला (Congress) चांगले दिवस येणार का? या प्रश्नचे उत्तर जाणून घेण्यासाठी 'सी-व्होटरने' सर्वेक्षण केले आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. मात्र, निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये साप्ताहिक निवडणूक सर्वेक्षण सी-व्होटरने केले.

Mallikarjun Kharge
Narendra Modi : 100 वर्षांच्या समस्या 100 दिवसात सुटणार नाहीत : रोजगार मेळाव्यात मोदींचे वक्तव्य!

या सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशातील एक हजार 397, गुजरातमधील एक हजार 216 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसच्या परिस्थितीत बदल होणार? या प्रश्नावर 42 टक्के लोकांनी काँग्रेसची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असे म्हटले आहे. तर 33 टक्के लोकांनी पूर्वीपेक्षा वाईट होईल, असे म्हटले आहे. तर 25 टक्के लोकांनी खर्गे यांच्या अध्यक्षतेमुळे कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले.

Mallikarjun Kharge
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर दीपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...

खर्गे यांचा मार्ग सोपा नाही, कारण गेल्या काही वर्षात पक्षाचा बहुतांश निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. अनेक ज्येष्ठ नेतेही पक्ष सोडून गेले आहेत. बंडखोरीचे आवाज अधून मधून ऐकू येत असतात. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी लढण्यासाठी काँग्रेसला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी विरोधी पक्षही टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. मात्र, सर्वेतील आकडेवारीमुळे काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com