मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर दीपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...

Deepali Syed : मागील अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद नाराज आहेत, असे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Deepali Syed
Deepali Syedsarkarnama
Published on
Updated on

Deepali Syed : मागील अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद नाराज आहेत, असे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचमुळे त्या शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्वच प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

दीपाली सय्यद (Deepali Syed) म्हणाल्या, काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते, त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतून लोकांपर्यंत पोहचतात. काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. प्रत्येकजण आपापले काम करत असतो. माझी कोणावरही नाराजी नाही आहे. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवतो. त्यामुळे मी नाराज नाही, असे दीपाली सय्यद यांनी सांगितले.

Deepali Syed
Vaibhav Naik : 'खरे राणे असाल तर माझ्याविरूद्ध निवडणूक लढवूनच दाखवा!'

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. दोन्ही नेते एकत्र यावेत, अशी माझी इच्छा होती, असेही त्या म्हणाल्या. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते. उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.

त्यांनी आधीच दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर पक्षात फूट पडली नसती, असेही त्या म्हणाल्या.

Deepali Syed
MCA च्या निवडणुकीत पवार-शेलार गटाचे काळे जिंकले; चर्चा मात्र, संदीप पाटील अन् नार्वेकरांची

माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगणार आहे. काही काम करायचे असेल तर आता आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो. ते खूप महत्त्वाचे आहे, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com