Parliament Special Session: मोदी सरकारने का बोलावले विशेष अधिवेशन ? अधिवेशनाचा अजेंडा आला समोर

Parliament Session: मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit Shah Sarkarnama

Delhi News : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात नेमकी कोणते विधेयकं मांडली जाणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा स्पष्ट करावा, यासाठी विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. अखेर मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा समोर आला आहे.

संसदेच्या या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतील भारताच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत अशा सर्व बाबींवर चर्चा होणार आहे. याबरोबरच पाच दिवसांच्या या अधिवेशनात चार विधेयकं देखील मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच याच अधिवेशन काळात पाच महत्वाच्या बैठका देखील होणार आहेत.

Narendra Modi and Amit Shah
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक : अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता

संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधक या बैठकीला उपस्थित राहतात का, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत माहिती न दिल्याने मोदी सरकारवर काँग्रेसने जोरदार टीका केली होती. अखेर आता अधिवेशनाचा अजेंडा समोर आल्यानंतर काँग्रेस काय भूमिका स्पष्ट करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by Ganesh Thombare

Narendra Modi and Amit Shah
Manoj Jarange Live Update: मराठा आरक्षणासाठी बापानंतर मुलगीही मैदानात; पल्लवी जरांगेंच्या भाषणाची राज्यात चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com