Manoj Jarange Live Update: मराठा आरक्षणासाठी बापानंतर मुलगीही मैदानात; पल्लवी जरांगेंच्या भाषणाची राज्यात चर्चा

Maratha Reservation Politics : गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. या आंदोलनामुळे राज्यभरात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विविध जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे.

बुलडाणा येथेही बुधवारी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने देखील आक्रमकपणे भाषण करत वडिलानंतर आता मुलीनेही सरकारचे लक्ष वेधले आहे.

"मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. आम्ही कोणता गुन्हा केला, त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही. आज माझे वडील १६ दिवस झालेत, समाजाच्या आरक्षणासाठी उपाशी जालना येथे आंदोलनाला बसलेत. आम्ही मराठा समाजात जन्म घेतला म्हणून काय गुन्हा केला का ?", असा सवालही यावेळी पल्लवीने केला.

Maratha Reservation
INDIA Alliance Meeting : 'इंडिया आघाडी'च्या बैठकीत मोठा निर्णय; भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्यात येणार

"आरक्षण आमच्या हक्काचे असून आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आंदोलन शांततेत सुरू असताना तुम्ही लाठीचार्ज करता. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते आंदोलन उठणार नाही, आमचा मराठा सहजासहजी पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही, आमच्या नादी लागायचे काम नाही", असा थेट इशाराच तिने सरकारला दिला.

"आमचे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर तुम्ही लाठीचार्ज करता, आम्ही हक्कांसाठी लढतोय, आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, असं म्हणत पल्लवी जरांगे हिने व्यासपीठावरून जोरदार भाषण केले. तिच्या या भाषणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Edited by Ganesh Thombare

Maratha Reservation
Manoj Jarange Live Update: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडे 'या' पाच अटींची केली मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com