Bala Bhegade & Dr.Pramod Sawant
Bala Bhegade & Dr.Pramod SawantSarkarnama

मावळच्या बाळा भेगडेंनी सांगितले, भाजपसह डॅा. सावंतांच्या विजयाचे गणित..

बाळा ऊर्फ संजय भेगडे (Bala Bhegade) हे उत्तर गोव्यातील `साखळी` त ठाण मांडून बसले होते.

पिंपरी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (GOA Assembly Election-2022) सोमवारी (ता.१४ फेब्रुवारी) व्हलेंटाईनच्या दिवशी मतदान झाले. तेथील भाजपचे (BJP) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्या साखळी मतदारसंघाचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे (Bala Bhegade) यांनी यावेळी डॉ.सावंत हे गतवेळपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, असा दावा मतदान संपल्यानंतर `सरकारनामा`शी बोलताना केला. पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीतील (Pandharpur by Election) विजयाची पुनरावृत्ती साखळीत होईल, असे ते म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढ्यात ते भाजपचे प्रभारी होते.

Bala Bhegade & Dr.Pramod Sawant
राज ठाकरेंना 'त्या' नगरसेवकाला धडा शिकवायचाय! म्हणूनच...

दरम्यान, गोव्यात भाजपच पुन्हा सत्तेत येणार असून यावेळी पक्षाला बहूमत मिळेल. चाळीसपैकी २२ जागा पक्ष जिंकणार असल्याचा दावा गोव्यात महिनाभर तळ ठोकून असलेले मावळचे माजी आमदार भेगडे यांनी केला. गोवा निवडणुकीतील भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गोवा टीममध्ये पहिला समावेश भेगडेंचा करण्यात आला. त्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ.सावंत यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर भेगडे हे उत्तर गोव्यातील `साखळी` त ठाण मांडून बसले होते. तेथील विजयाचे गणित मांडताना ते म्हणाले, या मतदारसंघात पक्षसंघटनेची चांगली बांधणी झाल्याची बाब पथ्यावर पडली. त्यामुळे तेथे नाविण्य़पूर्ण कल्पना राबवून काम करता आले.

Bala Bhegade & Dr.Pramod Sawant
संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर पळापळ... भाजपचे ते साडेतीन नेते कोण हे शोधण्यासाठी!

देश जिंकला, तर बूथ जिंकला आणि बूथ जिंकला, तर निवडणूक जिंकली, हे सूत्र तेथे अमलात आणले. २८ हजार ४२ मतदार असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या दोन हजार २७५ नवमतदारांचे प्रत्येक बूथवर जाऊन स्वागत केले. मतदारसंघातील पेजप्रमुख, बूथप्रमुख अशा अठराशे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. महिलांचे हळदीकुंकू आय़ोजित केले. शेवटच्या टप्यात मेरा परिवार, भाजप परिवार उपक्रमांत मतदारसंघात दोन हजार सहाशे घरांवर भाजपचा झेंडा लावून त्या घरांबाहेर रांगोळी काढली. आपल्याला आमदार हवा की पुन्हा मुख्यमंत्री हवा, ही प्रचाराची टॅगलाईन ठेवली. यामुळे गतवेळी दोन हजारांच्या फरकाने निवडून आलेले डॉ. सावंत यावेळी तीन हजारांच्या लीडने विजयी होणार आहेत, असा दावा भेगडे यांनी केला आहे. कारण गतवेळी तिरंगी लढत होती. यावेळी ती थेट कॉंग्रेसबरोबर झाल्याने मताधिक्य वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bala Bhegade & Dr.Pramod Sawant
ज्या `सागर` बंगल्यावर नाना पटोले काॅफी प्यायले तेथेच ते धडकणार होते पण...

गेल्या दहा वर्षात गोव्यात जे विकासाचे काम केले आहे, त्यामुळे तेथील जनता भाजपला पुन्हा सत्ता देईल. २०२२ ला २२ जागा मिळवून बहूमताने पक्ष सत्तेवर येईल. त्यातून राज्य व केंद्रातील सत्तेचे डबल इंजिनचे स्थिर सरकार गोव्याला मिळेल, असा आशावाद भेगडे यांनी व्यक्त यामुळे गोव्याला दहा वर्षे विकासाची, तर आता पाच वर्षे समृद्धीची ठरणार आहेत, असे ते म्हणाले. भेगडेंची ही भविष्यवाणी खरी ठरते का हे लवकरच कळणार आहे. आप आणि तृणमूल कॉंग्रेसने उभे केलेले नवे मोठे आव्हान, मगोप, कॉंग्रेस या जुन्या खेळाडूंसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने यावेळी लावलेला जोर भाजप मोडून काढतो का हेही मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com