Supreme Court News : सत्तासंघर्षाचा निकाल कधी? कायदे तज्ज्ञ म्हणतात...

ShivSena News : सर्वोच्च न्यायालयाने प्रदिर्घ सुनावणीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySarkarnama

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रदिर्घ सुनावणीनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तसेच या निकाला संदर्भाने महाराष्ट्रतील राजकारणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सरासरी एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिनाचा अवधी लागतो. जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती देता येत नाही. मात्र, महाराष्ट्राच्या खटल्यामध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल अशी शक्यता आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Sada Sarvankar : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या अडचणी संपेनात; आता न्यायाधीशही संतापले

सर्वोच्च न्यायालयात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार आहे हे आदल्या दिवशीच समजते. न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जेव्हा लागेल त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल.

ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Supriya Sule News : अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; आत्ता उन आहे : पण...

तसेच 20 मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी न्यायालयाला सुट्टी असणार आहे. एप्रिलच्या शेवटचा आठवडा किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता आहे, असे कायदे तज्ज्ञ म्हणतात. सत्तासंघर्षाचा हा निकाल कायदेशीरदृष्ट्याही महत्वपूर्ण असणार आहे. या निकालाचे मोठे राजकीय परिणाम देशाच्या राजकारणात दुरगामी पडणार आहेत. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com