CIJ Dhananjay Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्य सरकारला फटकारले; 10 लाखांचा दंड अन्...

State Government : मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडल्याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court on Mumbai Metro : मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडल्याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारला फटकारले. आम्ही तुम्हाला ८४ झाडे तोडण्याची परवानगी दिली, तरी देखील मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अवमान केला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई मेट्रोला 10 लाखांचा दंड ठोठावला. ही रक्कम मुख्य वनसंरक्षकांकडे जमा करण्याचे आदेशही दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रोला 15 मार्च 2023 च्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दिले.

Supreme Court
Indapur Bazaar Committee: इंदापुरात राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले : मोहोळचे आमदार यशवंत मानेंची बिनविरोध निवड

मुंबईतील (Mumbai) आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या परवानगीवरून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कोर्टाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हणाले की, 84 झाडे तोडण्याची परवानगी असताना तुम्ही 185 झाडे तोडण्याच्या उद्देशाने वृक्ष प्राधिकरणाकडे गेला होतात. असे करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) न्यायालयाचा अवमान केल्याचे म्हटले आहे.

न्यायालय म्हटले की, तुम्हाला गरज होती तेव्हा आम्ही परवानगी दिली होती. तुम्ही आणखी झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे गेलात. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CIJ Dhananjay Chandrachud) म्हणाले की, आम्ही 84 झाडे तोडण्याची परवानगी दिली. तुम्हाला आणखी झाडे तोडायची होती तर तुम्ही आमच्याकडे योग्य कारणे आणि सूचना घेऊन यायला हवे होते, पण तुम्ही वृक्ष प्राधिकरणाकडे गेले.

Supreme Court
Satara News : सत्यजित तांबेच्या गळ्याला शालीचा फास आवळत उदयनराजे म्हणाले, सगळ्यांनी असाच त्रास दिला ना...

या कामासाठी एमएमआरसीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते, हे न्यायालयाच्या अवमानाचे गंभीर प्रकरण आहे. दरम्यान, न्यायालयाची भूमिका पाहून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माफी मागितली आणि प्रतिज्ञापत्र दाखल करणे मान्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com