Indapur Bazaar Committee: इंदापुरात राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले : मोहोळचे आमदार यशवंत मानेंची बिनविरोध निवड

Director of Indapur Bazaar Committee: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळात उपसभापती म्हणून काम करत असताना मोहोळची आमदारकी मिळाली.
MLA Yashwant Mane
MLA Yashwant Mane Sarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार तथा इंदापूर तालुक्यातील शेळगावचे सुपुत्र यशवंत विठ्ठल माने (Yashwant Mane) यांची इंदापूर (Indapur) कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज राहिल्याने माने हे बिनविरोध संचालक झाले आहेत. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. (NCP MLA Yashwant Mane elected unopposed as Director of Indapur Bazaar Committee)

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. अर्ज छाननीनंतर १८ जागांसाठी १४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर येत्या २० एप्रिल रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, माने यांच्या बिनविरोध निवडीने इंदापूर बाजार समितीत राष्ट्रवादीने आपल्या विजयाचे खाते उघडले आहे.

MLA Yashwant Mane
Atique Ahmed's Last Letter : अतिकने लिहिलेले शेवटचे पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविले : पत्रात काही बड्या नेत्यांची नावे?

या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व ज्येष्ठ नेते अशोक घोगरे तसेच डॉ शशिकांत तरंगे यांच्यासह अन्य गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार आहे, हे २० तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे.

MLA Yashwant Mane
Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरले आणि दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत, त्यामुळे आमदार माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

MLA Yashwant Mane
Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समिती १० वर्षांनंतर प्रथमच बेळगावातील ६ मतदारसंघात निवडणूक लढणार: पाच ठिकाणी उमेदवार जाहीर

मागील काळात शेतकरीहिताचे निर्णय घेतले : माने

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडीबाबत आमदार यशवंत माने म्हणाले की, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळात उपसभापती म्हणून काम करत असताना मोहोळची आमदारकी मिळाली. बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांत शेतकरी व व्यापारी वर्गासाठी संचालक मंडळाच्या मदतीने हिताचे निर्णय घेतले. पुन्हा पाच वर्षांसाठी मला बिनविरोध संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल सर्व शेतकरी, व्यापारी मतदार, तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, डॉ. शशिकांत तरंगे यांचेसह सर्व मतदारांचे आभार मानतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com