China Weapons Report : भारतासाठी धोक्याची घंटा; अमेरिकेने जारी केला चीनचा 'तो' गुप्त रिपोर्ट

India-China Conflict : चीन कोणत्याही किंमतीत आपल्या सुरक्षेशी संबंधित माहिती बाहेर येऊ देत नाही.
China Weapons Report :
China Weapons Report :Sarkarnama
Published on
Updated on

India-China Tension : भारत आणि चीनमधील संघर्ष तसा जुना आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भारत- चीन सीमेवर ज्या पद्धतीने चीनच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे हे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. आपली माहिती जगापर्यंत पोहोचू न देणारा देश म्हणून चीनची ओळख आहे. अशा परिस्थितीत, जर चीनच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तर चीन याबाबत अधिक सतर्क असतो.

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अशातच या वृत्ताला रॉयटर्सच्या एका रिपोर्टने पुन्हा एकदा पुष्टी दिली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने चीनबाबत एक अहवाल जारी केला आहे, जो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाला या अहवालाची माहिती असणेही महत्त्वाचे आहे. चीन कोणत्याही किंमतीत आपल्या सुरक्षेशी संबंधित माहिती बाहेर येऊ देत नाही. मात्र, यावेळी अशी काही माहिती समोर आली आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

China Weapons Report :
Lok Sabha Election 2024 : 'INDIA' आघाडीत बिघाडी; समाजवादी वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात

अहवाल काय आहे आणि कोणी प्रसिद्ध केला आहे?

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने या आठवड्यात चीनच्या सैन्याबाबत वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. रॉयटर्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे. चिनी सैन्याकडे किती अणुबॉम्ब आहेत? चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये चीनकडे असलेल्या प्रत्येक शस्त्रास्त्राची माहिती देण्यात आली आहे. (India-China Conflict)

चीनकडे असलेली शस्त्रास्त्रे ?

अण्वस्त्रे: चीनकडे 500 ऑपरेशनल अणुबॉम्ब आहेत. 2030 पर्यंत, त्याच्या अण्वस्त्रांचा साठा सुमारे 1000 पर्यंत वाढेल. 2021 मध्ये अमेरिकेने चीनच्या अणुबॉम्बची संख्या 400 असल्याचे सांगितले होते. अणुबॉम्बच्या संख्येच्या बाबतीत चीनचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

जहाजे: चीनकडे आधीपासूनच जगातील सर्वात मोठे नौदल आहे. हे नौदलही वेगाने वाढत आहे. चीनच्या नौदल ताफ्यात 370 जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी त्यांची संख्या 340 होती. 2025 पर्यंत त्यांचा ताफा 395 जहाजांपर्यंत पोहोचेल आणि 2030 पर्यंत तो 435 जहाजांवर पोहोचेल. (China Amry)

परकीय लष्करी तळ : चीन जगभरात आपले लष्करी अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, केनिया, नायजेरिया, नामिबिया, मोझांबिक, बांगलादेश, पापुआ न्यू गिनी, सोलोमन बेटे आणि ताजिकिस्तानमध्ये आपले लष्करी तळ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

क्षेपणास्त्र: चीनने 2022 मध्ये तीन नवीन सायलो फील्डचे बांधकाम पूर्ण केले आहे. चीनकडे 300 नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) आहेत. ही क्षेपणास्त्रे सायलो याठिकाणी साठवली जातात. चीन पारंपरिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल श्रेणीतील क्षेपणास्त्र प्रणालीही तयार करत आहे. (India-China)

China Weapons Report :
Mohan Bhagwat Israel-Hamas War : 'हे' फक्त भारतातच होऊ शकते; इस्रायल-हमास युद्धावर मोहन भागवतांचे मोठे विधान

हा अहवाल भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण त्याच्या आधारावर नवी दिल्ली बीजिंगशी सामना करण्यासाठी आपली रणनीती तयार करू शकते. शस्त्रास्त्रांच्या संख्येवरून भारताला कोणत्या दिशेने काम करणे आवश्यक आहे याचा अंदाज लावण्याची संधी मिळेल. अशा माहितीच्या आधारे भारताने सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रांची उपस्थिती वाढवली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

China Weapons Report :
Ajit Pawar News : पालकमंत्रीपदाची सुत्रे घेताच अजितदादा पुन्हा सक्रीय; अन्य पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com