Mohan Bhagwat Israel-Hamas War : 'हे' फक्त भारतातच होऊ शकते; इस्रायल-हमास युद्धावर मोहन भागवतांचे मोठे विधान

Israel-Hamas War : गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 4385 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat Sarkarnama
Published on
Updated on

Mohan Bhagwat News : "हिंदू धर्म सर्व पंथांचा आदर करतो आणि ज्या मुद्द्यांवरून आज हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, त्या मुद्द्यांवर भारतात कधीही भांडणे झाली नाहीत" अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला दोन आठवडे उलटून गेले. या युद्धावर त्यांनी भाष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ''या देशात एक धर्म आणि संस्कृती आहे जी सर्व पंथ आणि श्रद्धांचा आदर करते. तो हिंदू धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतर सर्व (धर्म) नाकारतो. (Mohan Bhagwat)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohan Bhagwat
Bhujbal V/s Maratha : भुजबळ म्हणाले, तर माझी सर्व मालमत्ता तुम्हाला देऊन टाकतो!

"इथे तुम्ही हिंदू म्हणता तेव्हा मुस्लिमांनाही सुरक्षा देण्यात आली आहे हे सांगण्याची गरज नाही. हे फक्त हिंदूच करतात. हे फक्त भारतच करतो. इतर देशांमध्ये असे घडत नाही.सर्वत्र संघर्ष सुरू आहेत. युक्रेन युद्ध, हमास-इस्रायल युद्ध याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. अशा मुद्द्यांवरून आपल्या देशात कधीही युद्धे झाली नाहीत. (RSS) शिवाजी महाराजांच्या काळात झालेला हल्ला हा त्याच प्रकारचा होता पण या मुद्द्यावर आम्ही कधीच कोणाशी भांडलो नाही, म्हणूनच आम्ही हिंदू आहोत." असेही त्यांनी नमूद केले.

गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 4385 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून रॉकेटने हल्ला केला. या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हल्ल्यानंतरच इस्रायल-हमास युद्ध सुरू झाले.

Edited By- Anuradha Dhawade

Mohan Bhagwat
Shiv Sena Crisis : दिवाळीचे फटाके फुटल्यानंतरच राजकीय धमाका; शिवसेना पक्षावरची सुनावणी लांबली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com