Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी या तीन नेत्यांची नावे आघाडीवर : शिमल्यात काँग्रेस आमदारांची बैठक सुरू

पक्ष निरीक्षकांसमोर समर्थकांचे शक्तीप्रदर्शन आणि घोषणाबाजीनंतर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी तथा प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
Himachal Pradesh Congress
Himachal Pradesh CongressSarkarnama

शिमला : हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) काँग्रेसमध्ये (Congress) मोठी रस्सीखेच चालली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर समर्थकांचे शक्तीप्रदर्शन आणि घोषणाबाजीनंतर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी तथा प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदासाठी सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि राजेंद्र राणा यांची नावे आघाडीवर आहेत. काँग्रेस हायकमांड या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करू शकते, अशी सध्याची परिस्थिती आहे. (These three leaders Name are in the forefront for the post of Chief Minister of Himachal : Congress MLAs meet in Shimla)

दरम्यान, पक्ष निरीक्षक आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी प्रत्येक आमदाराची भेट घेत त्यांचे मत जाणून घेत आहेत. सध्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधानसभेच्या आवारात बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक निरीक्षक बघेल, हुडा आणि शुक्ला यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगितले आहे.

Himachal Pradesh Congress
Solapur Loksabha : सोलापूरच्या काँग्रेस नेत्यांचे अमोल मिटकरींनी वाढविले टेन्शन!

सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री, राजेंद्र राणा हे तिघे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यातील एकाला काँग्रेस हायकमांड मुख्यमंत्री बनवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी कालपासून आघाडीवर असलेले प्रतिभा सिंह यांचे नाव सध्या मागे पडले आहे. त्यामुळे प्रतिभा सिंह यांच्या जागी त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. हा वाद संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री असावा, असा सल्लाही काँग्रेसच्या निरीक्षकांकडून हायकमांडला देण्यात आला आहे. हायकमांडने याला सहमती दर्शवल्यास प्रतिभा सिंह यांच्या जागी अन्य कोणाला तरी मुख्यमंत्री केले जाऊ शकते, तर विक्रमादित्य सिंह यांना उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Himachal Pradesh Congress
Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये मोठे घमासान : सिंह समर्थकांची घोषणाबाजी; सुखविंदर सिंग समर्थक आमदारांची बैठक

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती. त्याचवेळी प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू यांच्या समर्थकांनीही त्यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी केली.

Himachal Pradesh Congress
Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

पक्ष निरीक्षक भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, राज्य प्रभारी राजीव शुक्ला, सहप्रभारी गुरकीरत सिंग कोटली यांनी प्रत्येक आमदाराशी आलटून-पालटून चर्चा केली. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रत्येकी दोन नावे विचारण्यात आली होती. त्याच्या चांगुलपणा आणि उणिवाही विचारण्यात आल्या. यानंतर सर्व आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला. काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्व आमदारांना मान्य असेल, असे त्यात म्हटले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठविण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com