Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये मोठे घमासान : सिंह समर्थकांची घोषणाबाजी; सुखविंदर सिंग समर्थक आमदारांची बैठक

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे जात असताना हिमाचलच्या प्रदेशाध्यक्षा सिंह यांचे समर्थक पक्षनिरीक्षकांच्या वाहनांसमोर उभे होते.
Pratibha Singh Supporter
Pratibha Singh SupporterSarkarnama

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) काँग्रेसने (Congress) निवडणुकीत सत्ता मिळविली. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींची आता खरी कसोटी लागणार आहे, कारण मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) अनेक नेते इच्छूक असून हायकमांड कोणाच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घालणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी पक्षनिरीक्षकांच्या गाड्यांसमोर सिंह यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या घोषणा दिल्या. दुसरीकडे, सुखविंदर सिंग सुखू यांना मुख्यमंत्री करण्याबाबत त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. (Big competition in Congress for Chief Ministership of Himachal Pradesh)

दरम्यान, सिमल्यात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. या ठिकाणी एक प्रस्ताव पारित करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे पक्षनिरीक्षक राजीव शुक्ला यांनी सांगितले. सिमल्यात सध्या काँग्रेस आमदारांची बैठक सुरू आहे.

Pratibha Singh Supporter
Rebels Defeated the BJP: बंडखोरांनी केला भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ : पक्षाच्या १४ उमेदवारांचा घडविला पराभव!

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर या छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला या तिन्ही नेत्यांवर काँग्रेस हायकमांडच्या वतीने मुख्यमंत्रिपदाची निवड आणि राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Pratibha Singh Supporter
हिमाचल जिंकणाऱ्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ मायलेकासह पाच नावे आघाडीवर!

पक्ष निरीक्षक म्हणून भूपेश बघेल, भूपेंद्र सिंह हुडा आणि राजीव शुक्ला हे शुक्रवारी सिमल्यात दाखल झाले. ते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे जात असताना हिमाचलच्या प्रदेशाध्यक्षा सिंह यांचे समर्थक पक्षनिरीक्षकांच्या वाहनांसमोर उभे होते. प्रतिभा यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या ते घोषणा देत होते. आमचा मुख्यमंत्री कसा असावा, प्रतिभा सिंह यांच्यासारखा असावा, सूर्य-चंद्र असेपर्यंत वीरभद्र सिंह यांचे नाव कायम राहील, अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. समर्थकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.

Pratibha Singh Supporter
भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा : राजीनाम्यानंतर म्हणाले, ‘बोलावणे आले तर दिल्लीला....’

दरम्यान, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी, सुखविंदर सिंग सुखू यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी राजधानी शिमलातील हॉटेल हिमलँडमध्ये रणनीती आखली. दुपारी दोनपासून आमदारांचे येथे आगमन सुरू झाले. आमदारांचे हॉटेलमध्ये आगमन झाल्याची माहिती मिळताच समर्थकांनीही हिमलँडमध्ये तळ ठोकला. समर्थकांनी सखू यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणाही दिल्या. सखू यांच्यासह अनेक आमदार सायंकाळी उशिरापर्यंत हॉटेलमध्येच होते. येथून सर्व आमदार एकत्रितपणे काँग्रेस मुख्यालयात गेले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन हिमाचलमध्ये सरकार स्थापनेचा दावा करणारी पत्रे सुपूर्द केली.

दरम्यान, सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. सगळी समीकरणं पाहायला मिळत आहेत. ते नवनिर्वाचित आमदारांच्या निर्णयावर सोडले पाहिजे. तो त्यांचा विशेषाधिकार आहे. त्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. आता आपला नेता कोण हवा, हे आमदारांनी ठरवायचे आहे.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा आणि खासदार प्रतिभा सिंह यांनी वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने वीरभद्र सिंह यांच्या नावावर, चेहऱ्यावर आणि कामावर विजय मिळवला आहे. त्याचे नाव, चेहरा आणि कुटुंबाचा वापर करून त्याचे श्रेय दुसऱ्याला द्या, असे होऊ शकत नाही. हायकमांड हे करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com