केंद्रीय मंत्र्याच्या हकालपट्टीचा तिढा; भाजपला 77 जागांवर फटका बसण्याची भीती

लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे.
Ajay Mishra and Amit Shah
Ajay Mishra and Amit Shah

Sarkarnama

Published on
Updated on

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) अडचणीत आले आहेत. राज्यातीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले असले तरी भाजप (BJP) मात्र यास नकार देत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षांच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण चेहरा म्हणून मिश्रांची ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. याचवेळी भाजपकडून मिश्रा यांच्या बचावाची भूमिका घेतली जात आहे. मुलाच्या पापाची शिक्षा पित्याला का, असा युक्तिवादही भाजपकडून केला जात आहे. भाजपने मिश्रांवर कारवाई करण्याचे प्रमुख कारण हे राज्यातील ब्राह्मण मतदार आहेत. ब्राह्मण असल्यानेच मिश्रांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पाच महिन्यांपूर्वी समावेश झाला होता. आता त्यांना डच्चू देऊन ब्राह्मण समाजाची नाराजी ओढवून घेण्याची भाजपची तयारी नाही.

Ajay Mishra and Amit Shah
मोदींनी नाश्त्याला बोलावलंच नाही अन् केंद्रीय मंत्र्याला डच्चू मिळण्याची चर्चा

राज्यात 2 कोटी ब्राह्मण मतदार आहेत. उत्तर प्रदेशातील 2014 विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण मतदारांपैकी 72 टक्के मते भाजपला मिळाली होती. नंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हाच टक्का 82 टक्क्यांवर गेला. राज्यात 2014 मध्ये भाजपने जिंकलेल्या 77 जागा अशा होत्या की तेथील विजय 10 हजार मतांच्या फरकाने झाला होता. राज्यातील 2 कोटी ब्राह्मण आणि 403 मतदारसंघ असे गणित मांडल्यास एका मतदारसंघात सरासरी 50 हजार ब्राह्मण मतदार आहेत. यामुळे मिश्रा यांची हकालपट्टी झाल्यास त्याचा फटका या 77 मतदारसंघात बसू शकतो, असा भाजपचा कयास आहे.

Ajay Mishra and Amit Shah
कर्नाटकातील आमदारानं काँग्रेसला दिल्लीत पाडलं तोंडावर

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा तपास करणाऱ्या एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com