मुख्यमंत्र्यासह अन्य नेत्यांना बॅाम्बनं उडवण्याची धमकी...

धमकीच्या पत्रावर पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए मोहम्मदचा कमाडंर सलीम अन्सारींचे नाव आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यासह अन्य नेत्यांना बॉम्बने उडवण्याची (Bomb attack) धमकी देण्यात आल्याने पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मान यांच निवासस्थान, राज्यपाल, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांचे घर आणि मंदिरांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचे पत्र काल दुपारी (ता.27 एप्रिल) सुल्तानपूर येथील लोधी रेल्वेस्थानकावर मिळालं आहे. हे पत्र जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरकडून लिहिलं असल्याची माहिती मिळत आहे. या पत्राद्वारे पंजाबमधील जालंधर, फिरोजपूर, सुल्तानपूर लोधी ही रेल्वे स्टेशन (Railway station) उडवण्याचीही धमकी देण्यात आली असून पोलिसांनी याबातचा तपास सुरू केला आहे.

Bhagwant Mann
मायावती बनणार राष्ट्रपती? सतीशचंद्र मिश्रांनी घेतली थेट योगींची भेट

आलेल्या या धमकीच्या पत्रात मुख्यमंत्री मान, राज्यपाल, विभागीय रेल्वे मॅनेजर सीमा शर्मा, अकालीचे नेते यांच्यावर २३ मे ला हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली असून लोहियांखास, फिरोजपूर, फगवाडा, जालंधर, सुल्तानपूर लोधी, आणि तरणतारण रेल्वेस्टेशनवर २१ मे ला बॅांम्ब हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. याबरोबरच पटियालामधील देवी तलाव मंदिर, काली माता मंदिर, फगवाडामधील हनुमान मंदिरात परिसरात देखील स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे, यामुळे पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Bhagwant Mann
धक्कादायक! पोलिस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण

प्राप्त झालेल्या धमकीच्या पत्रावर पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए मोहम्मदचा कमाडंर सलीम अन्सारींचे नाव आहे. सुल्तानपूर लोधीचे डीएसपी राजेश कक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर ठेवण्यात आली होते. तर प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार हे पत्र पोस्टाद्वारे सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांना मिळालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली असून स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

स्टेशन मास्तरांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी याची गांभिर्याने दखल घेतली असून याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. मिळालेल्या या धमकीच्या पत्रावर पोस्टाचं तिकिट चिकटवण्यात आले असून त्यावर तारिख आणि शिक्का नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तपासातून काय समोर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com