तालिबानच्या राजवटीत मुली शाळांमध्ये परतल्या पण...

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली आहे. सत्ता हाती मिळताच तालिबाननने अनेक गोष्टींवर बंदी आणण्यास सुरवात केली आहे.
Schoolgirls in Afghanistan
Schoolgirls in Afghanistan
Published on
Updated on

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. सत्ता हाती मिळताच तालिबाननने अनेक गोष्टींवर बंदी आणण्यास सुरवात केली आहे. असे असतानाच कट्टर असलेल्या तालिबानने मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. मुलींसाठी शाळांचे (Girl Schools) दरवाजे उघडले असले तरी केवळ 3 प्रांतातच हे घडले आहे. काही प्रांतांमध्ये मुलींसाठी वेगळ्या शाळा झाल्या असल्या तरी राष्ट्रीय पातळीवर याबाबत तालिबानने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

कुंडूझ, बाल्ख आणि सरेपुल या तीन प्रांतामध्ये काही ठिकाणी मुलींच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मुले आणि मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्याने मुलीही आनंदल्या आहेत. याबाबत बोलताना रझिया ही विद्यार्थिनी म्हणाली की, सुरवातीला मोजक्याच विद्यार्थिनी शाळेत येत होत्या. आता त्यांची संख्या वाढू लागली आहे.

तालिबानच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. यावर महिला या केवळ मुलांना जन्म देण्यासाठी असतात, अशी भूमिका तालिबानच्या प्रवक्त्यांनी घेतली होती. सार्वजनिक जीवनात महिलांवर अनेक बंधने आणण्यास तालिबानने सुरवात केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्याने अखेर तालिबानने मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लवकरच मुलींसाठी शाळा सुरू करण्यात येतील, अशी घोषणा तालिबानने केली होती. परंतु, याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही.

Schoolgirls in Afghanistan
लखीमपूर खीरीतील घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच बोलले...

महिलांवर पाशवी अत्याचार आणि बंधने घालण्याचे काम तालिबानने आधी त्यांची सत्ता असताना केले होते. तालिबानने १९९६ ते २००१ या काळात महिलांनी नोकरी करण्यास बंदी घातली होती. तसेच, मुलींच्या शिक्षणावरही बंदी घातली होती. याचबरोबर महिलांना सोबत पुरूष असल्याशिवाय घराबाहेर पडण्यासही मनाई होती. आता तालिबानने महिलांच्या हक्कांचे रक्षण करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, हे कसे करणार याबद्दल काहीच स्पष्ट केलेले नाही.

Schoolgirls in Afghanistan
मंत्र्याच्या पुत्राला गुन्हे शाखेत हलवले; मॅरेथॉन चौकशी सुरू

लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले होते. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले होते. अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com