मंत्र्याच्या पुत्राला गुन्हे शाखेत हलवले; मॅरेथॉन चौकशी सुरू

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Ashish Mishra
Ashish Mishra
Published on
Updated on

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अटक झाली आहे. त्याची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज त्याची गुन्हे शाखेने मॅरेथॉन चौकशी सुरू केली आहे.

न्यायालयाने आशिष याला काल (ता.11) तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला आज उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले. तेथे त्याची मॅरेथॉन चौकशी सुरू आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) आशिषची चौकशी केली. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली हे 9 सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा 9 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर झाला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी त्याला मागील दाराने आतमध्ये घेतले होते. त्यावेळी तब्बल 12 तास एसआयटीने आशिषची चौकशी केली होती. नंतर त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याची तात्पुरती न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्याच्या पोलीस कोठडीवर काल (ता.11) सुनावणी झाली. त्याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ashish Mishra
लखीमपूर खीरीतील घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच बोलले...

आधी झालेल्या चौकशीदरम्यान आशिषने घटना घडली त्यावेळी घटनस्थळापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील कुस्तीच्या कार्यक्रमात असल्याचे सांगितले होते. परंतु, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस आणि इतर व्यक्तींनी वस्तुस्थिती समोर आणली होती. आशिष हा 2 ते 4 या वेळेत कार्यक्रमस्थळी नव्हता. याबद्दल विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नव्हती. आशिषच्या मोबाईलची टॉवर लोकेशन घटनास्थळावरील दाखवत होती. याबद्दल त्याला विचारले असते त्याने घटनास्थळापासून जवळ असलेल्या राईस मिलमध्ये असल्याचे सांगितले. परंतु. याचा पुरावा त्याच्याकडे नव्हता.

Ashish Mishra
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांचे थेट बलाढ्य अमेरिकेलाच आव्हान

आशिष मिश्रा याच्या गाडीचा ड्रायव्हर हरी ओमने शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत ड्रायव्हर हरी ओमने तो गाडी चालवत असल्याचे म्हटले होते. हरी ओमने त्यावेळी पिवळा कुर्ता घातला होता. परंतु, घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे. यावर आशिषला उत्तर देता आले नव्हते. नंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. तसेच, काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अखेर अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com