Shivsena UBT : 'नकली शिवसेना अन् नकली राष्ट्रवादी'वरून महाराष्ट्रात धुरळा

Narendra Modi, Amit Shah : आमची शिवसेना ही काय बनावट डिग्री असल्याचे तुम्हाला वाटते का? आम्हाला सतत नकली म्हणणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,
Amit Shah, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra Modi
Amit Shah, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महाराष्ट्रात मूळ शिवसेना फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गटाने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार AJit Pawar आपल्या शिलेदारांसह सत्तेत जाऊन विसावले. परिणामी मागे राहिलेले शिवसेनेतील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट प्रमुख विरोधकांची भूमिका बजावत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election भाजपला राज्यभर मोठे आव्हान उभे केले आहे. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या दोन्ही गटांचा नकली असा उल्लेख केला आहे. त्यास उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे राज्यात प्रचारात असली-नकलीच्या मुद्द्यांवरून धुरळा उडला आहे.

उभ्या पक्षात फूट पडल्याने राज्यात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाजून सहानुभूती वाढल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका सत्तेत सहभागी झालेल्या गटासह भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे आणि पवार गटांप्रती असलेली सहानुभूती तोडण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री शाह यांनी मूळ आणि नकलीचा मुद्द्याची खेळी खेळल्याचे जाणकार सांगत आहेत.

चंद्रपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi शिवसेना ठाकरे गटाचे वर्णन नकली शिवसेना असे केले. तर नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटासह शरद पवार गटाला नकली पक्ष म्हणून हिणवले. बाळासाहेबांच्या विचार घेऊन मुख्यमंत्री शिंदे भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे त्यांची शिवसेना खरी असल्याचे लोकांवर ठासवण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे अजित पवार Ajit Pawar यांच्याबाबतही पहिल्यापासून तीच रणनीती असल्याचेही बोलले जाते. काँग्रेससोबत गेलेल्या ठाकरे आणि भाजपला साथ न देणाऱ्या पवार गटांना खोटे पाडून त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती कमी करण्याची स्ट्रॅटेजी भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेत्यांकडून वारंवार राबवली जात असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Amit Shah, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra Modi
Bhavana Gawali News : तिकीट कापल्याची मोठी खंत, आता मात्र...; गवळींनी थेट 'भावना'च व्यक्त केल्या

मोदी-शहा यांनी आपल्या पक्षाला नकली ठरवण्याच्या प्रयत्नाला उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. पालघर येथील जाहीर सभेतून ठाकरेंनी थेट नरेंद्र मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, आमची शिवसेना ही काय बनावट डिग्री असल्याचे तुम्हाला वाटते का? आम्हाला सतत नकली म्हणणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही ठाकरे म्हणाले. ठाकरेंनी मोदी-शाह यांना दिलेल्या जशास तसा उत्तराने पुढील काळात भाजप नेत्यांकडून त्यांचा नकली असा उल्लेख होणार नसल्याचेही आता बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात फूट पडल्यानंतरही ठाकरे आणि पवारांनी राज्यासह केंद्रीय सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्त झालेल्या जागावाटपातून ठाकरेंनी मी संपलेलो नाही, हेच दाखवून दिले आहे. तर शरद पवार Sharad Pawar सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक चाल हाणून पाडत आहेत. त्यांना विविध मार्गांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधारी वारंवार करताना दिसत आहेत. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत मात्र सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीलाही इंच इंच जागा लढवावा लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Shah, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra Modi
Madha Loksabha News: मोहिते पाटलांना उमेदवारी,राष्ट्रवादीत नाराजीचा भडका; अभयसिंह जगताप बंडाच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com