दाऊद, हाफीजवरील प्रश्नावर पाकिस्तानवर आली तोंड लपविण्याची वेळ!

Pakistan : पाकिस्तानचे दोन सदस्यांचे शिष्टमंडळ वाघा बॉर्डरवरून आज सकाळी भारतात पोहोचले.
Mohsin Butt, Pakistan Latest News
Mohsin Butt, Pakistan Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांना भारताकडे कधी सोपविणार? या प्रश्नावर पाकिस्तानची बोलतीच बंद झाल्याचे दृश्य आज पहायला मिळाले.

इंटरपोलच्या जागतिक संमेलनात सहभागी झालेले पाकिस्तानच्या (Pakistan) फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळाटाळ करताना, नो कॉमेंट,असे उत्तर देताना बट यांचा एकूणातील अविर्भाव हा 'तोंड लपविण्याचा' असल्याचे एएनआयच्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. (Mohsin Butt, Pakistan Latest News)

Mohsin Butt, Pakistan Latest News
सोन्यासारखा माल पण कमीमध्ये चाललायं.. भुजबळांनी भाव वाढवत लिलाव गाजवला...

दिल्लीत सुरू झालेल्या इंटरपोलच्या या जागतिक बैठकीत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाच्या सहभागाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत परिस्थिती स्पष्ट झाली नव्हती. बट यांच्यासह पाकिस्तानचे दोन सदस्यांचे शिष्टमंडळ वाघा बॉर्डरवरून आज सकाळी भारतात पोहोचले. मोहसीन बट हे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक आहेत.

या संमेलनाच्या दोन सत्रांद्रम्यान पत्रकारांनी त्यांना दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख असलेला सईद यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हे दोघेही अतिरेकी अंडरवर्ल्ड डॉन आहेत का? पाकिस्तान या दोघांना भारताच्या हवाली करणार का? यावर बट यांनी टाळाटाळ केली. सुरवातीला प्रश्न एकताच त्यांनी तोंडावर बोट ठेवले. त्यानंतर त्यांनी काही पुटपुट करत उत्तर देण्यासच नकार दिला.

Mohsin Butt, Pakistan Latest News
भाजप खासदाराच्या 'त्या' वक्तव्यावर पक्षात प्रचंड नाराजी; जे.पी नड्डांनी मागितलं स्पष्टीकरण

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत हाफिज सईदवर कायदेशीर करण्यासाठी जागतिक पातळीवर लढा देत आहे. भारताने वेळोवेळी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपासून संयुक्त राष्ट्र महासभेत उपस्थित केला आहे. अमेरिकेनेही हाफिजविरुद्धचा खटला लवकर चालवा, अशा शब्दांत पाकचे कान टोचले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com