सोन्यासारखा माल पण कमीमध्ये चाललायं.. भुजबळांनी भाव वाढवत लिलाव गाजवला...

Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही.
Chhagan Bhujbal Latest News
Chhagan Bhujbal Latest NewsSarkarnama

येवला : चला बोला...बघा डोळ्यासमोर सोन्यासारखा पिवळा धमक माल आहे...वाह रे पठ्ठे...२२०० रुपये एक वार, दोन वार अन तीन वार..अशी बोली लावत राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज अंदरसुल येथील मका लिलावात भाग घेत बोली लावली...निमित्त होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येथील उप बाजारात मका खरेदीच्या शुभारंभाचे.

दरम्यान, शेतकऱ्यांना आपला पिकवलेला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal Latest News)

Chhagan Bhujbal Latest News
आमदार जगतापांचं आरोग्यमंत्र्यांना साकडं; म्हणाले,गरीब बाळांसाठी एवढं कराच..

भुजबळ यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती अंदरसुल उपबाजार येथे मका व भुसार मालाच्या लिलावास शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला आणि माल कमी भावात चालला सांगत भाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भुजबळांनी लावलेली बोली बघून शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसत होता.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहे. देशात कृषी क्षेत्रात शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती झाली. त्यातून देश मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी मार्केटच विकेंद्रीकरण करणे अतिशय महत्वाचे असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal Latest News
मंत्री महोदयांच्या उपचारादरम्यान पाच मिनिटं लाईट गेली अन् लगेच जनरेटर मंजूर झालं...

पुढे ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. अद्याप मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे. याबाबत आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आलेली होती. त्यापैकी अद्यापही अनेक कामांची स्थगिती कायम असल्याने विकासृकामे रखडलेली आहेत. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना दीवाळीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com