Telngana Vidhansabha Election : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागेसाठी ३० नोव्हेंबरला मतदान पार पडले. या ठिकाणी २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या आकडेवारीत तीन टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत घट झाल्याने ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली असताना एका एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार तेलंगणातील एका जागेवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पराभवाच्या छायेत असल्याची शक्यता वर्तवली आहे.
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये 46 टक्के मतदान झाले. राज्याच्या तुलनेत हे मतदान 24 टक्के इतके कमी आहे. या शहरात तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज, लोकप्रिय कलाकार राहतात. विशेषतः काही तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कमी मतदान झाले आहे. येथील नागरिकांनी या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात फारसा रस दाखवला नसल्याचे दिसत आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीमध्ये हैदराबाद शहरातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Kcr) हे दोन ठिकाणांहून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रशेखर राव हे गजवेल व कामारेड्डी या दोन मतदारसंघांतून नशीब अजमावत आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेलंगणात बीआरएसच्या (BRS) पराभवाचा अंदाज वर्तविला आहे. अशा वेळी दोन्ही ठिकाणांहून रिंगणात उतरलेले चंद्रशेखर राव कामारेड्डी या मतदारसंघातून पराभवाच्या छायेत आहेत. 'केस स्टडीज' या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन्ही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कामारेड्डीतून चंद्रशेखर राव यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज आहे. या ठिकाणावरून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या निवडणुकीत त्यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. गजवेल येथे कमी फरकाने त्यांचा विजय होईल, असे 'केस स्टडीज'च्या सर्व्हेत म्हटले आहे.
सिलसिला या मतदारसंघातून चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. राव निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी ते विजयी होतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.