खळबळजनक : एकाच दिवशी दोन नगरसेवकांची गोळ्या घालून हत्या

पश्चिम बंगालमध्ये नगर पालिकांच्या निवडणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यातच रविवारी दोन नगरसेवकांच्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.
Anupam Dutta and Tapan kandu
Anupam Dutta and Tapan kanduSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नगर पालिकांच्या निवडणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यातच रविवारी दोन नगरसेवकांच्या (Corporator) हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे. दोन्ही नगरसेवकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यापैकी एक नगरसेवक काँग्रेस (Congress) व दुसरा तृणमूल काँग्रेसचे (TMC) आहेत. दरम्यान, भाजपने हा मुद्दा उचलून धरत सत्ताधारी टीएमसीवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालमधील पानीहाटी आणि झालदा परिसरात या घटना घडल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-24 परगणा जिल्ह्यातील पानाही नगरपालिकेतील तृणमूलचे नगरसेवक अनुपम दत्ता (Anupam Dutta) यांची हत्या झाली आहे. रविवारी सायंकाळी ते औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडलेले असतानाच दुचाकीवरून आलेल्या युवकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती. नागरिकांनी त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Anupam Dutta and Tapan kandu
मीही थोडा कायदा शिकलोय! फडणवीसांच्या चौकशीवर वळसे पाटलांनी विधानसभेत दिलं उत्तर

दुसऱ्या घटनेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक तपण कंडू (Tapan Kandu) यांची हत्या झाली आहे. ते पुरूलिया जिल्ह्यातील झालदा नगरपालिकेत निवडून आले होते. रविवारी सायंकाळी घराजवळच फिरत असताना त्यांच्यावर तीन युवकांनी गोळीबार केला. त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला. खंडू हे सलग चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या भागातील ते काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

खंडू यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीवर आरोप केले आहेत. राजकीय षडयंत्रातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप नेपाल महतो यांनी केला आहे. तर अनुपम दत्ता यांच्या हत्येवरून टीएमसी नेत्यांनी भाजपकडे बोट दाखवले आहे. भाजपच्या (BJP) बड्या नेत्याला दत्ता यांनी निवडणुकीत हरवले होते. त्यामुळे ही हत्या पूर्व नियोजित होती, असं आमदार पार्थ बौमिक यांनी सांगितले.

या हत्याकांडानंतर भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी तृणमूलवर टीका केली आहे. टीएमपीसीची वाटचाल 1972-77 मधील काँग्रसेच्या काळासारखी सुरू आहे. लोकप्रतिनिधींची अशाप्रकारे हत्या होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होत असेल? केंद्र सरकारनेही याची दखल घ्यायला हवी. आम्ही लोकसभेतही याबाबत आवाज उठवू, असं मुजूमदार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com