मीही थोडा कायदा शिकलोय! फडणवीसांच्या चौकशीवर वळसे पाटलांनी विधानसभेत दिलं उत्तर

फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुमारे दोन तास चौकशी केली.
Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
Dilip Walse Patil, Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुमारे दोन तास चौकशी केली. यावरून भाजपने (BJP) राज्यभर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीची राज्यभर होळी केली. तसेच फडणवीस यांच्या चौकशीवरून सोमवारी विधानसभेतही चर्चा झाली. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सरकारच्यावतीनं विधानसभेत उत्तर दिलं. (Assembly Session)

वळसे पाटील यांनी सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विशेषाधिकारांचं हनन करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मीही थोडा कायदा शिकलो आहे. पण कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून नव्हे तर जबाब देण्यासाठी त्यांच्याकडे जी माहिती मिळाली ती कुठून कशी मिळाली यासाठी होती. त्यांना अडचणीत आणण्याचा कटात फसवण्याचा प्रयत्न नाही. तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करेल आणि अंतिम निर्णय होईल. हा विषय याठिकाणी थांबवावा, अशी विनंती वळसे पाटील यांनी केली.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
संसदेचं कामकाज सुरू होताच अचानक झाला मोदी-मोदीचा गजर! पंतप्रधान पाहतच राहिले...

फोन टॅपिंग झाल्यानंतर फडणवीस यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला. पण चौकशी कऱण्याबाबत राज्य सरकारने आधीच एक समिती नेमली होती. त्या समितीने अहवाल दिल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात झाला. एखादा गुन्हा दाखल होतो, त्यावेळी त्या गुन्ह्याबाबत चौकशीचे काम तपास अधिकाऱ्यावर असते.

तपास करत असताना 24 जणांचे जबाब घेतले. सीआरपीसीतील 160 कलमांतर्गत तपासी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कुणालाही बोलवण्याचा अधिकार आहे. त्यात मी वाद घालू इच्छित नाही. परंतू, आधी नोटीस दिली होती. प्रश्नावली पाठवली होती. पण फडणवीसांना काही कारणाने उत्तर देता आले नाही. म्हणून पुन्हा 160 ची नोटीस पाठवली. आता तो जबाब पोलीस ठाण्यात घ्यायचा की घरी, त्याबाबत चर्चा झाली. नंतर घरी जबाब घेतला, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
...'ती' चूक सोनियांनी स्वीकारली! सिध्दूंसह पत्नी व मुलीवर फोडलं खापर

मी प्रश्न आणि उत्तर काहीच पाहिले नाही. माहिती बाहेर कशी गेली, याबाबत चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी तपास करत असताना केंद्रीय गृह सचिवांनाही पत्र पाठवून पेन ड्राईव्ह उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तपास पूर्ण करायचा असेल तर सर्व संबंधितांचे सर्कल पूर्ण करावे लागते. विरोधी पक्षनेते यांनी आपल्याकडे काय माहिती आहे, त्याचं उत्तर काय द्यायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा तपासाचा एक नियमित भाग आहे, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com