Loksabha Election 2024 : काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला ठेंगा दाखवित आज पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी 42 उमेदवारांना सोबत घेत रॅम्पवाॅक केला. पश्चिम बंगाल मधील सर्वच्या सर्व 42 जागांवर तृणमुल काँग्रेस ने आपले उमेदवार आज जाहिर केले. या उमेदवारांमध्ये क्रिकेटपटू युसुफ पठाण, माजी बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांचा समावेश होता. या रॅम्पवाॅक दरम्यान, आसनसोल मधुन लोकसभेचे उमेदवार म्हणून लढणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांची देखील उपस्थिती होती.
तृणमुल काँग्रेसने आज 'एकला चालो रे' चा नारा देत काँग्रेस, भाजप, सीपीआय (एम) यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. कोलकत्ता मध्ये आयोजित जन गर्जना सभेत तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिले स्वतः रॅम्पवाॅक केला. त्यानंतर जसे जसे उमेदवार घोषित करण्यात आले तसे तसे त्यांच्या सोबत ममता बॅनर्जी यांनी रॅम्पवाॅ क करत उमेदवारांची ओळख करुन दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना डायमंड हार्बर जागेवरुन उमेदवारी देण्यात आली. तर क्रिकेटपटू युसुफ पठाण यांना बेहरामपूर या मतदार संघात उमेदवारी देण्यात आली. या ठिकाणी काँग्रेस चे अधिर रंजन चौधरी यांच्यासोबत त्यांचा मुकाबला असू शकतो. त्यामुळे अधिर रंजन चौधरी यांच्यासाठी ही युसुफ पठाण मोठी डोकेदूखी ठरु शकतात.
पश्चिम बंगाल मध्ये आम्ही एकटेच लढणार अशी सिंह गर्जना ममता बॅनर्जी यांनी यासभेत केली. आसाम आणि मेघालय येथे देखील काँग्रेस आणि भाजप विरोधात उमेदवार उभे करण्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले. उत्तरप्रदेशात देखील तृणमुल काँग्रेस उमेदवार उभे करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करत या विषयी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मतांची लुट भाजपला करायची आहे. त्यामुळे निवडणुक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रिय दल तैनात करण्याचा मोठा दबाव अरुण गोयल यांच्यावर होता त्यांनी तो फेटाळत राजीनामा दिल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगाल मध्ये सीएए लागू होऊ देणार नाही अशी गर्जना ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तृणमुल नेत्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी देत त्यांना कृष्णानगर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्री आणि राजकारणी सायोनी घोष यांना जाधवपुर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. हावरा येथून फुटबाॅल पटू प्रसुन बंडोपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप बंडोपाध्याय यांना उत्तर कोलकत्ता येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तृणमुल काँग्रेस इंडिया आघाडीत असताना त्यांनी कुठल्या दबावात एकतर्फी उमेदवार जाहिर केले असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ता जयराम रमेश यांना पडला होता. त्यांनी ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत असताना असे का केले असा प्रश्न उपस्थित केला.
तृणमुल ने जाहिर केलेल्या उमेदवारांमध्ये कांठी येथील उत्तम बारीक, घाटल येथील अभिनेते देब, झारग्रामचे पद्मश्री कालीपदा सोरेन, मेदिनीपूरचे जून मालिया, पुरुलियाचे शांती राम महतो, बांकुरा येथील अरुप चक्रवर्ती, वरदमन दुर्गापूर- कीर्ती आझाद, बीरभूमचे शताब्दी रॉय, बिष्णुपूरचे सुदाता मंडल खान यांचा समावेश आहे. दमदम मधून सौगता रॉय, बारासातमधून काकोली घोष दस्तीदार, बशीरहाटमधून हाजी नूरुल इस्लाम, जयनगरमधून प्रतिमा मंडल, मथुरापूरमधून बापी हलदर, कोलकाताहून मामा रॉय, दक्षिणेतून सुदीप रॉय. उलुबेरियातील साजदा अहमद, श्रीरामपूर येथील कल्याण बॅनर्जी, हुगळीमधून रचना बॅनर्जी, आरामबागमधून मिताली बाग आणि तमलूकमधून देबांशू भट्टाचार्य यांना तिकिटे मिळाली आहेत.
मोदींवर केला अभिषेक बॅनर्जी यांनी पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलिगुडी येथे आयोजित मेळाव्या ममता बॅनर्जी यांच्या पुतण्यावर जोरदार टिका केली होती. त्यांनी काहींना आपल्या पुतण्याला समोर आणायचे असल्याची टिका पश्चिम बंगाल मध्ये केली होती. त्या टिकेला उत्तर देत ममता बॅनर्जी यांचे पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी 'मोदी गॅरंटी झिरो वाॅरंटी' अशी जहरी टिका केली आहे. आता पर्यंत चोर हे जेल मध्ये जात होते आता ते बीजेपी मध्ये जातात हीच मोदींची गॅरंटी आहे, असा ही आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.