Karnataka Assembly Elections: दहा मे पासून भाजपच्या ऱ्हास होण्यास कर्नाटकातून सुरवात; ममता बॅनर्जींचा घणाघात

Mamta Banerjee ON Karnataka Assembly Elections : कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे,
Narendra Modi, Mamata Banerjee
Narendra Modi, Mamata BanerjeeSarkarnama

Mamta Banerjee ON Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सत्ताधारी भाजपा पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या वर्षीही कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी लढत होत आहे. ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींनी कर्नाटकमध्ये त्रिंशकू परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले आहे.

Narendra Modi, Mamata Banerjee
Sanjay Raut News : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही ; राऊताचं सूचक Tweet ; 'हे पैज लावून..'

या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठ विधान केले आहे. टीएमसीच्या जनसंपर्क अभियानात ममता बॅनर्जी बोलत होत्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान आहे, तर १३ मे रोजी निकाल आहे. "दहा मे नंतर भाजपचे अस्तित्व संपण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे मला आनंद होईल," असे त्या म्हणाल्या.

आपल्या स्वार्थासाठी भाजपा हिंदु धर्माला बदनाम करीत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपा ही लवकरच सत्तेच्या बाहेर जाणार आहे. देशासाठी ही मोठी बाब असणार आहे. मतदारांनी भाजप मत देऊ नये, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. (Political Short Videos)

Narendra Modi, Mamata Banerjee
NCP New Chief : मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला ; कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न ; अध्यक्षपदी..

"भाजपच्या ऱ्हास होण्यास कर्नाटकातून सुरवात होणार असल्याचा मला आनंद आहे," असेही त्या म्हणाल्या. दिल्लीत जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

विजयपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात उघड बंड करुन त्यांना पायउतार करणारे फायर ब्रँड उमेदवार आमदार बसवनगौडा पाटील (यत्नाळ) यांची काँग्रेस अब्दुल हमीद मुश्रीफ यांच्याशी दुसऱ्यांदा जोरदार लढत होत आहे. विजापुरात ‘काटे की टक्कर' पहावयाला मिळणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले जुने हिशेब चुकते करणार असल्याचीही चर्चा मतदारसंघात रंगली आहे. (Political Web Stories)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com