TMC Manifesto 2024: ममतादीदींच्या टीएमसीचा जाहीरनामा आला; CAA कायद्यासह 'या' 10 घोषणा

West Bengal CM Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने लागू केलेल्या सीएए, एनआरसी कायद्यांविरोधी भूमिका घेण्यात आली आहे.
TMC Manifesto, Mamata Banerjee
TMC Manifesto, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरमसाठ आश्वासन दिली जात आहेत. यासाठी विविध पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. नुकतेच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने (BJP And Congress) आपापल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत.

अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या जाहीरनाम्यात भाजपने लागू केलेल्या सीएए, एनआरसी कायद्यांच्या विरोधी भूमिका घेण्यात आली आहे. (Mamata Banerjees Party Manifesto for Lok Sabha Election 2024)

टीएमसीने (TMC) आपल्या जाहीरनाम्यात एनआरसी रोखण्याचा आणि युसीसीला (NRC, UCC) संपूर्ण देशामध्ये लागू होऊ न देण्याचं आश्वासन दिलं आहे. या घोषणांद्वारे ममतादीदींनी (Mamata Banerjee) मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. तर सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी काही मोठ्या घोषणा जाहीरनाम्यामध्ये करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक 2024 साठी तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा आज बुधवारी (17 एप्रिल) रोजी जाहीर केला. या जाहीरनाम्यात टीएमसीने 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये हा पक्ष सत्तेत आल्यास घरपोच 5 किलो राशन आणि बीपीएल कुटुंबांना वर्षभरात 10 गॅस सिलिंडर मोफत दिले जातील, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

टीएमसीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाचे नेते डेरेक ओ ब्रायन (Derek O Brien) म्हणाले, केंद्रात टीएमसीचे सत्ता आल्यास मनरेगासाठी दिवसाला 400 रुपये दिले जातील. सर्वांना कायमस्वरूपी पक्की घरं दिली जातील. तसेच 60 वर्षावरील व्यक्तींना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन दिली जाईल. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती स्थिर ठेवल्या जातील.

TMC Manifesto, Mamata Banerjee
Congress: 'या' राज्यात काँग्रेसच्या 'हाती' भोपळा? ओपिनियन पोलच्या अंदाजाने राहुल गांधींची धडधड वाढवली

तसंच 25 वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना महिन्याला शिष्यवृत्ती मिळेल, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यांना 10 लाखांपर्यंत स्टूडंट क्रेडिट कार्ड देण्यात येणार, तर बंगालमधील लक्ष्मी भांडारच्या धर्तीवर महिलांना महिन्याला पैसे मिळतील. यासह सर्वांना 10 लाखांपर्यंचात आरोग्य विमा मिळेल, अशी घोषणा टीएमसीच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com