Lok Sabha Election 2019 Opinion Poll: भाजपने 'अब की बार 400 पार' तर काँग्रेसने 'हात बदलेगा हालात' म्हणत लोकसभा निवडणुकीच्या जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवाय एनडीए आणि इंडिया आघाडीकडून (India Alliance) देशातील मतदार आपल्याला मतदान करेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
अशातच एका वृत्तवाहिनीने देशातील लोकसभेच्या सर्व मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. या वृत्तवाहिनीच्या ओपिनियन पोलमध्ये (Opinion poll) कोणत्या पक्षाला धक्का बसणार आणि कोणत्या पक्षाला यश मिळणार आहे, याच चित्र समोर आलं आहे.
लोकसभेसाठी (Lok Sabha) काही राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) थेट लढत होणार आहे. यातील काही राज्यांमध्ये भाजप (BJP) काँग्रेसला वरचढ असल्याचं दिसत आहे. देशातील अशीच काही राज्य आहेत जिथे काँग्रेसला साधं आपलं खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलने वर्तवला केला आहे. तर काँग्रेसला धोक्यात आणण्याची शक्यता असणारी ही राज्य नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊया.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्ली
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील (Delhi) लोकसभेच्या 7 पैकी 6 जागांवर भाजपचा विजय होऊ शकतो असा अंदाज आहे. तर उरलेली एक जागा आम आदमी पार्टीच्या वाट्याला जाणार आहे. दिल्लीत भाजपप्रणित एनडीएला (NDA) 53.47 टक्के तर इंडिया आघाडीला 33.05 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 2019 च्या तुलनेत एक जागा कमी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला राजधानीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
गुजरात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) गुजरातमध्ये भाजप सर्वच्या सर्व 26 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशात एकूण 25 लोकसभेच्या जागा आहेत. यामध्ये वाएसआरसीपीला 13, भाजपला दोन, टीडीपीला (TDP) 8, आणि जेएसपीला (JSP) 2 जागा मिळू शकतात. त्यामुळे आंध्रप्रदेशमध्येही काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
झारखंड
झारखंडमधील 14 पैकी 12 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडी केवळ एकच जागा जिंकण्याती शक्यता आहे. इंडिया आघाडीतील जेएमएमला ही जागा मिळणार आहे. त्यामुळे या राज्यातही काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचं दिसत आहे.
छत्तीसगड
छत्तीसगडमधील सर्व म्हणजेच 11 जागांवर भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये एनडीएला 58.06 टक्के तर इंडिया आघाडीला 28.79 टक्के मते मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी अपयश येऊ शकतं.
पंजाब
सध्या आम आदमी पार्टीचा दबदबा असणाऱ्या पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा आपलाच मिळू शकतात. तर भाजपला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्येही काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सुद्धा पराभूत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या ठिकाणी शिरोमणी अकाली दल एक जागा जिंकू शकते.
मध्यप्रदेश
मध्यप्रदेशात सर्वच्या सर्व म्हणजेच 29 लोकसभा मतदारसंघात भाजप विजयी होताना दिसत आहे.
पश्चिम बंगाल
ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात भाजपला चांगील संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु इथे काँग्रेसच्या पदरी काहीच पडणार नसल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी टीएमसीला (TMC) 21 तर एनडीएला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला केवळ एक जागा मिळू शकते.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.