
Kolkata News : कोलकात्त्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देश सुन्न झाले होते. या घडनेला अद्याप एक वर्ष होत नाही तोच दुसऱ्या घटनेनं देशात संतापाची लाट निर्माण केली आहे. येथील साऊथ कोलकात्ता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर या प्रकरणात तृणमूल काँग्रेस पक्षाचा एका नेत्याला अटक झाली आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसवर (TMC) टीकेची झोड उठली असतानाच पक्षाचे खासदार देखील आहे. आता याच पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानाने एकच गदारोळ उडाला आहे. त्यांनी जर एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? असे वक्तव्य केल्याने आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर भाजपने यावरून रान उठवलं आहे. (TMC MP Kalyan Banerjee’s controversial rape comment amid Kolkata law student gangrape outrage)
कोलकात्ता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर (Kolkata law student) सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उडकीस आल्यानंतर देशात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर न्यायालयाने त्यांची रवानणी पोलिस कोठडी केली आहे. यात आता कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेस पक्षाचा एका नेत्याचा समावेश असतानाच खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
त्यांनी, "जर एखाद्या मित्रानेच त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? आता शाळा, कॉलेजमध्ये देखील पोलिस ठेवावे लागतील. त्या विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने बलात्कार केला आहे. असा प्रकार फक्त विकृतच करू शकतात. अशा विकृतीविरोधात महिलांनी लढले पाहिजे. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला ताबडतोब अटक करावी असे मी वारंवार सांगत असल्याचेही खासदार बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या या विधानाने एकच गदारोळ सुरू झाला असून भाजपने यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल भाजपने x वर पोस्ट करत याचा निषेध केला असून, 'टीएमसी खासदार बलात्काराच्या आरोपींना पाठिंबा देत आहेत! कसबा येथे एका विद्यार्थ्यावर टीएमसी नेत्याने आणि त्याच्या टोळीने सामूहिक बलात्कार केला आणि कल्याण बॅनर्जी महिला सुरक्षेला राजकीय अजेंडा बनवत असल्याची टीका केली आहे. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूपच वाईट आहे आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत ममता सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बंगालच्या मुलींना असुरक्षित आणि दुर्लक्षित असल्याचे वाटत आहे.
याच प्रकरणावरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देताना, 'वर्गमित्रांकडून होणारा बलात्कार आता सामान्य झाला आहे का?' 'कल्याण बॅनर्जी यांनी या गुन्ह्याला क्षुल्लक लेखले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांचे काम आता फक्त ममता बॅनर्जी यांच्या घराचे रक्षण करणे आणि टीएमसी नेत्यांचे छत्र धरणे आहे का?' असे सवाल उपस्थित केले आहेत.
या वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर आता खासदार कल्याण बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असून ते कधीही अशा गुन्ह्यांचा समर्थक नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.