TMC Surprise Entry in Congress Black Protest: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावरुन तीन दिवसापासून देशातील राजकारण तापलं आहे.
यावरुन आज (सोमवारी) विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काळे कपडे परिधान करुन मोदी सरकारचा निषेध केला. दोन्ही सभागृहात यावरुन खडाजंगी झाली. सोनिया गांधींही यात सहभागी झाल्या होत्या.
आठ दिवसापासून विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी काँग्रेसला वगळून अन्य विरोधी १४ पक्ष एकत्र आले होते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर काँग्रेसी-भाजप मुख्यमंत्र्यांशी भेटी-गाठी सुरु केल्या होत्या. पण शुक्रवारी अचानक राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.
आज (सोमवारी) काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाची बैठक बोलवली होती. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे खासदारही उपस्थित होते.
यावर खर्गे म्हणाले, "लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहे, मी सर्वांचा आभारी आहे. अन्य विषयावर मतभेद असू शकतात, पण राहुल गांधी यांच्या या विषयावर सर्वांनी एकत्र आले पाहिजे,"
राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे खासदार आज काळे कपडे परिधान करुन संसदेत आले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेतील त्यांच्या चेंबरमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली.
काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आप आणि टीएमसीसह १४ पक्ष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला तृणमूल काँग्रेसची उपस्थिती आश्चर्यकारक होती. याबाबत खर्गे म्हणाले की, लोकशाही रक्षणासाठी जो पुढे येईल त्याचे स्वागत करू.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेयांनी ट्विट केले आहे, "लोकशाहीसाठी "काळा अध्याय"! सत्ताधारी पक्ष पहिल्यांदाच संसद ठप्प करत आहे. का? कारण मोदीजींच्या जिवलग मित्राची काळी कृत्य उघड होत आहेत. विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम आहे," असे खर्गे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.