Awhad Vs Mhatre : आव्हाड आणि म्हात्रें यांच्यात Twitter War रंगले..

Jitendra Awhad and Sheetal Mhatre Twitter War : शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंच्या फोटो टि्वट केला होता.
Jitendra Awhad and Sheetal Mhatre Twitter War
Jitendra Awhad and Sheetal Mhatre Twitter WarSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad and Sheetal Mhatre Twitter War : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात गेल्हा दोन-तीन दिवसापासूव टि्वरवॉर रंगले आहेत.

काही दिवसापासून शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडिओवरुन त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या व्हिडिओवरुन ठाकरे गट, मविआ आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

काल (रविवारी) ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. या सभेच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंच्या फोटो टि्वट केला होता. यावरुन म्हात्रे आणि आव्हाड यांच्यात टि्वटरवार रंगले आहे.

Jitendra Awhad and Sheetal Mhatre Twitter War
Sanjay Raut News: 'सदू आणि मधु भेटले'; मुख्यमंत्री-राज ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला

रविवारी संध्याकाळपासून म्हात्रे आणि आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. शीतल म्हात्रेंच्या २५ मार्च रोजी केलेल्या एका टि्वटमुळे या वादाला तोंड फुटलं आहे.

उद्धव ठाकरेंना उर्दूत शुभेच्छा देणारे पोस्टर मालेगावात लावण्यात आले होते. हीच का तुमची हिंदुत्त्ववादी विचारधारा? असा सवाल म्हात्रेंनी यावेळी विचारला.

हा बॅनर उर्दू भाषेत छापला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना..खांग्रेसची चमचेगिरी”, असं टि्वट शीतल म्हात्रेंनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेसंदर्भातला हा बॅनर होता.

जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर प्रसिद्ध करुन शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं होते. आव्हाड आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होते की "दुसऱ्यांवर ढकलायची तुमची सवय आहे,"

“पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान”, असं म्हात्रेंनी म्हटल्यानंतर त्यावर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असं खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com