
मतचोरीवरुन काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रान उठवलं आहे. पत्रकार परिषदा घेऊन मतदार याद्या, लोकसभेसाठी झालेले मतदार, यातील गैरप्रकार हे उघडकीस आणत केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मतदार यादीतून नाव कमी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचललं आहे. मतदार यादीतील नाव वगळणे, नवीन नावाचा समावेश करणे यासाठी आयोगाने कार्यपद्धतीत बदल केला आहे. यासाठी ऑनलाईन ई-पडताळणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी किंवा नवीन नाव नोंदण्यासाठी आता संबधीत व्यक्तीला त्यांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर वन-टाईम पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतरच पुढील मतदार यादीतील प्रक्रिया होणार आहे.
"अशी काही प्रकरणे असू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती आपले नाव काढून टाकू इच्छित असेल तर त्याने ऑनलाइन आक्षेप नोंदवताना दुसर् याचे नाव किंवा फोन नंबर दिला असेल." या अतिरिक्त सुविधेमुळे अशा प्रकारचा गैरवापर टाळता येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
निवडणूक आयोगाने आठवडाभरापूर्वी ई-पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे. कर्नाटकातील अलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आल्याच्या कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर म्हणून हे केले गेले नाही, असा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.
"एखाद्या मतदारसंघातील मतदार त्या विशिष्ट मतदारसंघातून प्रवेश वगळण्यासाठी ऑनलाइन फॉर्म 7 भरू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की केवळ फॉर्म-7 सबमिट करून ती एंट्री आपोआप हटवली जाते." मतदारांची नावे वगळण्यासाठी 6 हजार 18 अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले होते. पडताळणी केल्यानंतर केवळ 24 अर्ज योग्य असल्याचे आढळून आले, तर 5,994 अर्ज चुकीचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे केवळ 24 नावे हटविण्यात आली, तर 5,994 चुकीचे अर्ज फेटाळण्यात आले, असे आयोगाने म्हटलं आहे.
जेव्हा आम्ही मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हाच निवडणूक आयोगाने मतचोरीवर बंदी घातली, असा दावा राहुल गांधी यांनी बुधवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये केला आहे. कर्नाटक सीआयडीला अलांडमधील नावे हटविण्याबाबत पुरावे कधी देणार, असा सवाल निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांना राहुल गांधी यांनी केला आहे. "ज्ञानेश जी, आम्ही चोरी पकडली आणि मग तुम्ही आता कुलूप लावण्याची आठवण केली. आता आम्ही चोरांना पकडू," असा टोला राहुल यांनी आयोगाला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.