

Gadkari on MLFF: येत्या काही दिवसात टोलसाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा टोल प्लाझावर दिसणार नाहीत, कारण यापूढे वाहनचालकांना टोलसाठी कोणीही अडविणार नाही, पण टोल भरावा लागणार आहे. तुमचा टोल इलेक्ट्रॉनिक प्रणालीव्दारे आपोआप कापला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.
यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत सांगितले. या प्रणालीमुळे टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
देशभरातील टोल प्लाझांवरील रांगा, टोलसाठी थांबावे लागणे आणि वेळ वाया जाण्याचा त्रास लवकरच संपणार असे गडकरी म्हणाले. पुढील एका वर्षात संपूर्ण देशात एक नवीन “इलेक्ट्रॉनिक / barrier-less टोल वसुली प्रणाली” लागू करण्यात येणार आहे.
नव्या प्रणालीची व्यवस्था सध्या 10 ठिकाणी करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाक्यावर फक्त इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारेच टोल स्वीकारला जाणार आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्रणाली आणि एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन 2026 अखेर पूर्णपणे अंमलात येणार आहे, त्यामुळे वाहनचालकांना टोल नाक्यांवर टोलसाठी थांबावे लागणार नाही, अशी माहिती नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
गुजरातमधील चोर्यासी टोल प्लाझा (राष्ट्रीय महामार्ग 48 वर) आणि हरियाणातील घरौंडा टोल प्लाझा (राष्ट्रीय महामार्ग 44 वर) येथे देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील पाच टोल प्लाझावरही चाचणी सुरू आहे.
नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर थांबावं लागणार नाही. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि इंधनाची बचत होईल
वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. साधारण 1500 कोटी रुपयांची बचत होईल असा नितीन गडकरी यांचा अंदाज आहे.
कमी इंधन खर्चामुळे प्रदूषण कमी होणार असून ही पर्यावरणपूरक यंत्रणा ठरणार आहे.
सध्याच्या फास्टटॅग प्रणालीला या नव्या प्रणालीत इंटीग्रेट केलं जाणार आहे.
एआयच्या मदतीने वाहनांची अचूक ट्रॅकिंग आणि टोल वसुली केली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.