PMC ELection: ठरलं! पुण्यातही भाजप-शिंदे सेनेची युती; मुंबईचे नेते आज पुण्यात फार्मूला ठरवणार

Pune Municipal Election BJP–Shiv Sena Alliance Fixed: शिंदे सेनेकडून युतीसाठी 31 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचा सांगितलं जात आहे. मात्र यामध्ये काटछाट होऊन भाजप शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
PMC ELection
PMC ELectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन आपण निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट केला आहे. त्याचवेळी या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

भाजपने पुण्यात सुरुवातीपासून स्वबळाचा नारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याची भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर आता शिंदेंच्या सेने सोबत युती करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी दर्शवली असल्याचे समोर आले आहे. मात्र या युतीच्या चर्चा शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांशी होणार नसल्याचा आता समोर आला आहे. भाजपचे स्थानिक नेते थेट मुंबई मधून येणाऱ्या नेत्यांशी युती संदर्भात आज चर्चा करणार आहेत.

भाजपकडून या युतीच्या चर्चा भाजपने ज्या नेत्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे, असे माजी सभागृह नेते गणेश बिडकर केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे करणार आहेत. मुंबईमधून एकनाथ शिंदे हे आपले विश्वासातील तीन नेते पुण्यामध्ये आज पाठवणार आहेत. त्यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा समावेश असणार असून तेच प्रामुख्याने शिंदेंकडून चर्चेचे प्रमुख असतील. आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये या चर्चा होणार आहेत. याच बैठकीत युतीच्या जागेच्या फार्मूलावर अंतिम चर्चा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

शिंदे सेनेकडून युतीसाठी 31 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचा सांगितलं जात आहे. मात्र यामध्ये काटछाट होऊन भाजप शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागावाटप फायनल झाल्यानंतर थेट 27 तारखेला इच्छुकांना थेट उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात येणार असल्याचं समोर आले आहे.

PMC ELection
BJP PUNE: उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना बसणार शॉक; नव्या चेहऱ्यांना संधी?

दरम्यान सध्या तरी या युतीच्या चर्चांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सामावून घेण्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी शिंदे सेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आम्ही युतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत 30 जागा घेणार नाही इतक्या कमी जागा दिल्या तर आणि स्वबळावर निवडणूक लढू असा स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मुंबईच्या नेत्यांनी येऊन केलेली बोलणी स्थानिक नेते मान्य करणार का आणि युतीमध्ये सर्व अलबेला राहणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com