प्रियांका चतुर्वेदींच्या राजीनाम्यानंतर थरूर एकटेच राहिले अन्...

हिवाळी अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत निलंबन केल्याने चतुर्वेदी यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे.
Shahsi Tharoor, Priyanka Chaturvedi
Shahsi Tharoor, Priyanka ChaturvediSarkarnama

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Parliament Winter Session) पहिल्याच दिवशी राज्यसभेत बारा खासदारांचे निलंनब करण्यात आले. विरोधकांकडून हे निलंबन रद्द करण्यासाठी आठवडाभर आंदोलन करूनही केंद्र सरकार झुकलं नाही. त्यामुळे संतापलेल्या निलंबित खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी संसद टीव्हीवरील निवेदक पदाचा रविवारी राजीनामा दिला आहे.

प्रियांका चतुर्वेदी या संसद टीव्हीवरील (Sansad TV) मेरी कहानी कार्यक्रमाचे निवेदन करत होत्या. या कार्यक्रमात महिला खासदारांशी संवाद साधत त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला जातो. प्रियांका यांनी राजीनामा देताना जिथे माझे प्राथमिक अधिकारच काढून घेण्यात आले आहेत, तिथे या पदावर राहण्यासाठी तयार नसल्याचे म्हटले आहे. बारा खासदारांच्या निलंबनामुळे हे झाल्याचे चुतर्वेदी म्हणाल्या आहेत.

Shahsi Tharoor, Priyanka Chaturvedi
नीतिश कुमारांना मोठा धक्का; भाजपनं बड्या नेत्याचेच घर फोडले

चतुर्वेदी यांच्या राजीनाम्याचे स्वागत विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही ट्विट करत प्रियांका यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. पण याचवेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्याकडेही इशारा केला आहे. थरूर हेही संसद टीव्हीवरील 'टू द पॉईंट' या कार्यक्रमाचे निवेदक आहेत. ओब्रायन यांनी थरूर यांनाही राजीनामा देण्याचे सुचवले आहे.

आता निवेदक म्हणून एक विरोधी खासदार राहिले आहेत. तेही संसदेची थट्टा करणाऱ्या सरकारचा तिरस्कार करतील, असं ओब्रायन यांनी म्हटलं आहे. यावर थरूर यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये संसद टीव्हीवर निवेदक म्हणून प्रियांका चतुर्वेदी व शशी थरूर यांना दोन खासदारांची निवड करण्यात आली होती. निवेदक म्हणून विरोधी पक्षातील हे दोनच खासदार होते. आता केवळ थरूर हेच उरले आहेत. त्यामुळे थरूर काय भूमिका घेणार, याकडे विरोधकांच लक्ष लागलं आहे.

निलंबनानंतर चतुर्वेदी यांनी सरकारवर जोरदार शरसंधान साधले होते. त्यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याही यावरून वाद घातला होता. पण राज्यसभेचे सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या चतुर्वेदी यांनी निवेदक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राज्यसभेचे सभापती वेंकैय्या नायडू यांना लिहिलं आहे. संसद टीव्हीवरील मेरी कहाणी या कार्यक्रमाच्या निवेदक पदावरून राजीनामा देत असल्याने खूप वेदना होत आहेत. मनमानीपध्दतीने बारा खासदारांचे निलंबन करून संसदेतील त्यांचा सहभाग नाकारण्यात आला आहे. त्यामुळे संसद टीव्हीवरील कार्यक्रमातही मी थांबू शकत नाही. त्यामुळे मी पायउतार होत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com