महापालिका निवडणुकीत काँग्रेससह भाजपची धूळधाण

कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 144 पैकी 134 जागांवर विजय मिळाला आहे.
Mamata Banerjee

Mamata Banerjee

Sarkarnama

Published on
Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) बाजी मारली आहे. कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत तृणमूलने 144 पैकी 134 जागा जिंकत भाजपसह काँग्रेस व डाव्यांची दाणादाण उडवली आहे. तीनही पक्षांना दुहेरी आकडाही पार करता आलेला नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने (BJP) प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण मतांनी एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली. त्यानंतर आठ महिन्यांनी होत असलेल्या कोलकाता महापालिका निवडणुकीतही (Kolkata Municipal Corporation) ममतांनी विरोधकांना धक्का दिला आहे.

<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee</p></div>
काँग्रेसची पडझड सुरू; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

कोलकाता महापालिकेच्या 144 जागांसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतल्याचा कल होता. हा कल शेवटपर्यंत कायम राहिला. तृणमुलने 144 पैकी 134 जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीपेक्षा दहा जागा अधिक मिळवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ममतांना बंगालमध्ये मिळालेला हा सलग दुसरा मोठा विजय आहे.

2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 124 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या पदरात केवळ पाच जागा पडल्या होत्या. तसेच डाव्यांनाही पाचच जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप व डाव्यांना मागील आकडाही टिकवता आला नाही. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या असून डावे पक्ष व काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांनी तीन जागा मिळाल्या आहेत.

या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, हा खूप मोठा विजय आहे. यातून लोकांनी आम्हाला स्वीकारल्या स्पष्ट संदेश गेला आहे. भाजप, डावे आणि काँग्रेस कुठेही नाहीत, असे ममता म्हणाल्या. दरम्यान, मतदानाआधी भाजप व तृणमूलमध्ये जोरदार खडागंजी उडाली होती. ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती भाजपने केली होती. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं होतं. पण कडेकोट बंदोबस्तात झालेल्या या निवडणुकीत तृणमूलने बाजी मारली आहे.

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा भाजपकडून उचलून धरण्यात आला होता. पण या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा तृणमूलच्याच बाजूने कल दिल्याचे दिसते. बहुतेक वॉर्डमध्ये तृणमूलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा मिळण्याची अपेक्षा पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. तर भाजपला विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही यश मिळालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com