Tripura CM : त्रिपुराच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार महिला मुख्यमंत्री... 'हे' नाव आहे चर्चेत...

भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या.
Tripura CM :
Tripura CM : Sarkarnama

Tripura CM : भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकामंध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले आहे. निवडणुकांनंतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. विशेष म्हणजे पूर्व भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री पद एका महिलेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक त्रिपुराच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांनी धानपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ही जागा डाव्या आघाडीचा बालेकिल्ला मानली जात होती. मार्च 1998 ते मार्च 2023 पर्यंत माजी मुख्यमंत्री माणिक सरकार या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येत आले.

Tripura CM :
Old Pension Scheme : आमदारांची पेन्शन रद्द करा; पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा : आमदार विक्रम काळे आक्रमक

त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाने 32 जागा जिंकल्या. भगवा पक्षाला जवळपास 39 टक्के मते मिळाली. तर टिपरा मोथा पक्ष १३ जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 11 तर काँग्रेसला फक्त तीन जागा मिळवता आल्या. इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) ने एक जागा जिंकून आपले खाते उघडण्यात यश मिळविले आहे.

कोण आहेत प्रतिमा भौमिक?

1. प्रतिमा भौमिक यांना विधानसभा निवडणुकीत 42.25 टक्के मते मिळाली. त्यांना 19,148 मते मिळाली आणि त्यांनी धानपूर विधानसभा मतदार संघांतून त्या निवडूण आल्या. प्रतिमा यांना 'त्रिपुराची दीदी' आणि 'प्रतिमा दी' म्हणूनही ओळखले जाते.

2. भौमिक यांनी 1998 आणि 2018 मध्ये धानपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. माणिक सरकार विरुद्ध त्या दोन्ही निवडणुका हरल्या. मात्र, यावेळी त्यांनी त्याच जागेवरून माकपच्या कौशिक चंदा यांचा 3500 मतांनी पराभव केला.

3. त्रिपुराचा पुढचा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, भौमिक म्हणाल्या की, “मी पक्षाची समर्पित कार्यकर्ता आहे. केवळ पक्षामुळे मी तुमच्यासमोर बसले आहे. पक्षाच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढवली. पार्टी माझी आई आहे. त्यामुळे कोणीही काही अंदाज लावू नये. पक्ष जे म्हणेल ते मी करेन."

4. भौमिक भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर 2019 मध्ये संसदेत निवडून आल्यानंतर दोन वर्षांनी जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

5. प्रतिमा भौमिक या विज्ञान विषयात पदवीधर आहेत. 1991 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Tripura CM :
Sandeep Deshpande Attack : आरोपीविरोधात 'ही' धक्कादायक बाब समोर; तब्बल १३ गुन्हे दाखल आणि...

6. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वर्षानंतर भौमिक भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य झाल्या. त्यांना धनपूर मंडळाचे प्रमुखही करण्यात आले.

7. भौमिक यांनी पक्षाच्या युवक आणि महिला शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. 2016 मध्ये त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले.

8. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भौमिक यांनी तत्कालीन खासदार शंकर प्रसाद दत्ता यांचा 305,689 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

9. शाळेतील शिक्षक असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या भौमिक यांना तीन भावंडे आहेत. सुरुवातीच्या काळात त्या ब्लॉक, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खो-खो आणि कबड्डी खेळायच्या. सोनमुरा येथील बारनारायण या मूळ गावीही त्यांच्या शेती हा पारंपरिक व्यावसाय आहे.

10. भौमिक या त्रिपुराचे पुढील मुख्यमंत्री होतील या शक्यतांवर बोलताना त्रिपुराचे भाजपचे प्रमुख राजीव भट्टाचार्य म्हणाले की, "विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. 1-2 दिवस प्रतीक्षा करा. भाजपमध्ये नेत्यांची कमतरता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com