Chhattisgarh Politics : निवडणुकीच्या तोंडावर टी एस देव बनले उपमुख्यमंत्री; काँग्रसने नाराजी केली दूर? छत्तीसगडच्या घडामोडींना वेग...

TS Singh Deo Deputy Cm : "आम्ही आता तयार आहोत..."
T S Singh Deo Deputy Cm : Bhupesh Baghel
T S Singh Deo Deputy Cm : Bhupesh BaghelSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh News : छत्तीसगड राज्यातील काँग्रेसचे नेते टी.एस. सिंह देव (T S Singh Deo Deputy Cm) यांना आता उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा काळ राहिलेला असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. टी. एस. सिंह देव यांना सरकारमध्ये क्रमांक दोनचे स्थान देऊन पक्षाने एकप्रकारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. देव यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. (Latest Marathi News)

आम्ही तयार आहोत - मुख्यमंत्री भूपेश बाघेल

मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी कॅबिनेट मंत्री टी एस सिंह देव यांना उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. टी एस सिंह देव यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत, त्यांनी लिहिले की, आम्ही तयार आहोत. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

काँग्रेस आणि राज्याच्या विकासासाठी काम करणार - देव

उपमुख्यमंत्री बनल्यानंतर रात्री 11 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टी एस सिंह देव म्हणाले की, "काँग्रेस अध्यक्षांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे, मी आभार व्यक्त करू इच्छितो. सर्वांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या भल्यासाठी, छत्तीसगडच्या भल्यासाठी आणि उर्वरित मर्यादित काळातही जनतेच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते नक्कीच करणार."

T S Singh Deo Deputy Cm : Bhupesh Baghel
ED Raid : IRS अधिकारी सचिन सावंतांकडे आढळली बेहिशोबी मालमत्ता ; सदनिकेसाठी दीड कोटी रोख..

काँग्रेसने मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते :

मुख्यमंत्री भुपेश बाघेल आणि देव या दोघांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी मेहनत केली होती. त्यामुळे तब्बल 15 वर्षे छत्तीसगडमध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

काँग्रेस अध्यक्षांनी हा निर्णय घेतला :

पक्षाच्या छत्तीसगडच्या प्रभारी सरचिटणीस कुमारी सेलजा यांनी टी एस सिंह देव यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. यानंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यातील अन्य काही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत टी एस सिंह देव यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाला मंजुरी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com