ED Raid : IRS अधिकारी सचिन सावंतांकडे आढळली बेहिशोबी मालमत्ता ; सदनिकेसाठी दीड कोटी रोख..

IRS officer Sachin Sawant News update : सानपाड्यातील सदनिका त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे.
ED Raid  irs officer sachin sawant
ED Raid irs officer sachin sawantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आयआरएस (IRS) अधिकारी सचिन सावंत यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणा तपास ईडी करीत आहे.

तपासात आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे ईडीला बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. आयआरएस कॅडरचे अधिकारी सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते.

ED Raid  irs officer sachin sawant
Anil Parab News : अटक टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्याची न्यायालयात धाव ; महापालिका अभियंत्याला मारहाण..

सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीने बुधवारी सकाळी छापा टाकला होता. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २.४५ कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

500 कोटी रुपये बेकायदेशीर रित्या वळवण्याच्या एका प्रकरणातील आरोपीने आयआरएस अधिकारी सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सीबीआयने एफआरआय दाखल होती. या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

ED Raid  irs officer sachin sawant
Mahadev Jankar : महादेव जानकरांना पुन्हा मंत्रिपदाची आशा; भाजपा काय करणार ?

आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर भ्रष्टाचार आणि मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. त्यांनी सदनिका घेण्यासाठी दीड कोटी रोख स्वरुपात दिल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहेत.

त्यांची सानपाड्यातील सदनिका त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. तर गॅस त्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या पथकाने त्यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती घेतली आहे.

काय आहे प्रकरण ..

  1. हिरे व्यापाऱ्यांनी ५०० कोटीहून अधिक रकमेचे बेकायदा हस्तांतरण आणि हस्तांतरण केल्याच्या प्रकरणात आयआरएस अधिकारी सचिन सावंत सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

  2. त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या या छाप्याकडे चौकशीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. पुरावे गोळा करण्यासाठी आणि बेकायदा हस्तांतरण आणि पैसे पाठविण्यात काही संबंध किंवा सहभाग आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com