

Tamil Nadu Politics : अभिनेता विजय यांनी बहुमतासाठी आवश्यक ते संख्याबळ जमवले असून त्यांचा आज शपथविधी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र,त्यांचा आजचा शपथविधी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊनही विजय यांचा टीव्हीके पक्ष अजुनही बहुमतापासून दूर आहे. बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. मात्र, टीव्हीके काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांचा पाठींबा मिळून 116 आमदारांचा पाठींबा होत आहे.
व्हीसीके या दोन आमदार असलेल्या पक्षाने विजय यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विजय यांचा पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचला होता. मात्र, आपली भूमिका बदल व्हीसीकेने अजूनही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे समजते. व्हीसीकेने जाचक अटी घातल्याने विजय यांची कोंडी झाली आहे.
उपमुख्यमंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी व्हिसीकेकडून करण्यात आले आहे. तसेचविजय हे ज्या दोन विधानसभा जागांवर विजय झाले आहेत. त्यातील एक जागा ते सोडतील ती जागा व्हीसीकेला देण्यात यावी. त्यामुळे व्हिसीकेच्या अटीमुळे अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विजयकडे बहुमतासाठी अजुनही दोन आमदारांची कमतरता आहे.
जोपर्यंत 118 पाठींबा असलेल्या आमदारांचे पत्र साजर केले जात नाही तोपर्यंत विजय यांना शपथविधीसाठी आमंत्रित करणार नसल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी स्पष्ट केले आहे. कोणाकडे कितीही आमदार असून त्याच्याशी माझं देणंघेणं नाही. फक्त बहुमत हवं. जर डीएमके आणि एडिएमके यांनी एकत्र येत बहुमत दाखवल तर त्यांनाही संधी देईल, असे देखील राज्यपाल म्हणाले.
टीव्हीके - 108
डीएमके - 59
एडीएमके - 47
काँग्रेस - 5
पीएमके - 4
IUML - 2
CPI - 2
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.