PM Modi Indonesia Visit : एकविसावे शतक आशियाचे ; आशियाई-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे सूतोवाच!

ASEAN-India Summit : "आशियाई देशांच्या परस्पर सहकार्यामध्ये सातत्याने प्रगती होत आहे."
PM Narendra Modi Indonesia Visit
PM Narendra Modi Indonesia Visit Sarkarnama

East Asia Summit in Jakarta News : पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी आज इंडोनेशियात आयोजित आशियाई-भारत शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उपस्थित झाले आहेत. या नियोजित कार्यक्रमानंतर मोदी भारतात परतणार आहेत. येत्या ९ आणि १० सप्टेंबरला नवी दिल्लीत G-20 शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. (Latest Marathi News)

आशियाई-भारत शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी इंडोनेशियामध्ये दाखल झाले. जकार्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi Indonesia Visit
Raju Kormore News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी

आशियाई-भारत परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आशिया हा भारताच्या धोरणांचा प्रमुख आधार आहे. भारत-पॅसिफिक उपक्रमातही आशियाई प्रदेशाचे प्रमुख स्थान आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही, प्रत्येक क्षेत्रात आशियाई देशांच्या परस्पर सहकार्यामध्ये सातत्याने प्रगती होत आहे. "

आशियाई-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले, "आमची (आशियाई देश) भागीदारी चौथ्या दशकामध्ये प्रवेश करत आहे. या शिखर परिषदेच्या भव्य आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष विडोडो यांचे अभिनंदन करतो. आशियाई शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन."

२१ वे शतक आशियाचे शतक - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जागतिक विकासात आशियाची भूमिका महत्त्वाची आहे. वसुधैव कुटुंबकम् 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य', ही भावना भारताचा मुख्य गाभा आहे. २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे. मला विश्वास आहे, आजची आमची चर्चा भारत आणि आशियाई क्षेत्राचे भवितव्य अधिक मजबूत करण्याचं उद्दीष्ट्य साध्य करेल. आपला इतिहास-भूगोल भारत आणि आशियाला एकत्रित आणतो. आशिया आणि भारताचे सामाईक मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी - एकतेचा विचार आम्हाला एकत्रित करतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com