Demonetization of 2000 Note : दोन हजार रुपयांची नोटबंद; बँक दिवसाला स्वीकारणार 'इतकी' रक्कम

RBI Announcement Today : 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार
Note
NoteSarkarnama
Published on
Updated on

2000 Note Demonetize : दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षात 2000 रुपयांच्या नोटा फारशा वापरल्या जात नसल्याचं रिझर्व बँकेने निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसीनुसार हा निर्णय घेतला आहे. आता सर्व बँकांनी आरबीआयच्या निदर्शनानुसार, सर्व बँकांनी ताबडतोब एटीएममध्ये असलेल्या 2000 च्या नोटा काढून घेण्याचे निर्देश रिझर्व बँकेने दिले आहेत.

Note
RBI Withdraw 2000 RS Currency Note : दोन हजाराची नोट बंद झाल्यानंतर, तुम्ही काय करायला हवं?

सर्वसामान्य लोकांना दोन हजाराच्या नोटा 23 मे नंतर बँकेतून बदलून घेता येणार आहेत. तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकेची व्यवस्था करण्यात यावी, असं सुचना देताना रिझर्व बँकेने म्हटलं आहे. आरबीआयने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येकाला 20 हजार रुपयांपर्यंत म्हणजे दोन हजारांच्या 10 नोटा बदलून घेता येणार आहेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बँकांच्या सर्व शाखांमधये दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. नोटा बदलण्यासाठी आलेल्या प्रत्येकी केवायसी तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच ग्राहकांकडून नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. एका ग्राहकाकडून दिवसाला 23 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. (RBI Announcement)

Note
RBI Big Announcement: मोदी सरकारची दुसरी नोदबंदी; एक ऑक्टोबरपासून दोन हजाराची नोट होणार कागदाचा तुकडा

दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत काय आहेत आरबीआयचे महत्त्वाचे मुद्दे?

- सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

- एटीएममध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा देखील काढून घेण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

- बँकांच्या तिजोरीमध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा या आरबीआयकडे जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आरबीआयने याबाबत सूचना दिल्यानंतर या नोटा जमा करून घेण्यात येतील.

- बँकांकडे सध्या असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा या अन फिट सदरामध्ये जमा झाले आहे.

- बँकांनी तपासणी करूनच या नोटा जमा करून घेण्यात घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

- 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना नोटा जमा करता येतील.

केवायसीची खातरजमा केल्यानंतरच या नोटा जमा करून घेण्यात येतील. संशयास्पद व्यवहारांची माहिती तातडीने आरबीआयला देण्याचा आदेश देण्यात आलेत.

- नागरिकांना एकावेळी कमाल वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करून मिळतील.

- दोन हजार रुपयांच्या नोटांचे डिपॉझिट करण्यासाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही

- नागरिकांनी 23 मेनंतर नोट बदलीसाठीच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आरबीआयने आवाहन केले आहे.

- नोटा बदलीसाठी दुर्गम भागातील नागरिकांसाठी मोबाईल व्हॅन वापरण्याचा आदेश.

- जनधन खात्यामध्ये त्यांच्या मर्यादापेक्षा जास्त व्यवहार करण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. याचा अर्थ दोन हजार रुपयांच्या नोटांद्वारे काळा पैसा जनधन अकाउंटमध्ये जाणार नाही. याची काळजी घेण्याचा आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

- दोन हजार रुपयांच्या नोटा या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात ग्राह्य धरल्या जातील.

- लोकांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने गर्दीचे व्यवस्थापन करण्याची आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com