New Delhi : भारतीय रिझव्र्ह बँकने दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केले आले. रिझर्व्ह बँकेने बँकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे पासून बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.
तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. ही नोट अजूनही वैध आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून 2000 रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला बँकेत जाऊन 2000 रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन एका दिवशी 2000 रुपयांचे चलन घेऊन 20,000 रुपयांपर्यंत रक्कम बदलू शकणार आहात. तुम्ही तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता.
8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली. त्या बदल्यात रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, काही वर्षांतच 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आणि बहुतांश एटीएममधून या नोटा गायब झाल्या. आत पुन्हा दोन हजाराच्या नोटा बंद करण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात ₹ 2000 च्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.