Uddhav Thackeray: VVPAT बंद करतात, मग निवडणूका कशाला घेतात? उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला जाब

Uddhav Thackeray Delhi tour VVPAT Election Commission: आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट बंद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबत शिवसेना उद्धव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कुंटुबासह दिल्लीत दाखल झाले असून इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला आले आहे.

आज ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बैठकीपूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजप, मोदी सरकार, निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. व्हीव्हीपॅट बंद करतात, मग निवडणूका कशाला घेतात? असा सवार ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदात दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहेत. आमचं मत कुठे जातेय हे आता व्हीव्हीपॅट बंद केल्यामुळे आपल्याला कळणार नाही, आमचे मतांची कुठे नोंद होते, हे कसे समजणार, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

व्हीव्हीपॅट काढल्यानंतर आता निवडणुकीचा फार्स कशासाठी? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको, असे भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी देखील म्हटले होते, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावेळी भाजपला करुन दिली आहे.

Uddhav Thackeray
Local Body Election: सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समविचारी पक्षांनी फुंकले रणशिंग, तिसरी आघाडी स्थापन करणार

"मोदी यांच्या सरकारला नितीमत्ता राहिलेली नाही. पाकिस्तान आपला शत्रू आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको. आपल्या माता-भगिनींचा सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट कसे खेळू शकतो," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

"‘सच्चा देशभक्त’ची व्याख्या करायची असेल तर ‘सच्चा देशभक्त’ हा पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवणारा असला पाहिजे. ‘सच्चा देशभक्त’ यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नयेत, असे टोला ठाकरेंनी हाणला.

अघोषित एनआरसी लागू ?

बिहार विधानसभा निवडणूकीत आता मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची आहे, देशात अघोषित एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) लागू करण्यात आले आहे का, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे संतप्त म्हणाले...

सीएए आणि एनआरसीचा मुद्दा दिल्लीमध्ये गाजला होता. त्याविरोधात रान उठवलं होतं. अनेक ठिकाणी त्याविरोधात आंदोलने झाली होती. आसाममध्ये एनआरसीविरोधात आंदोलन झाले होते. त्यामध्ये भारतीय नागरिकांना ते भारतीय असल्याची ओळख पटवून द्यायची होती. आताही निवडणूक आयोगाने नागरिकांना तुम्हीच तुमची ओळख पटवून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशात अघोषित एनआरसी लागू झाले आहे का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com