Thackeray Attack on Nadda : उद्धव ठाकरे बोलले की यांचा 'नड्डा' सुटतो ; ठाकरेंचा हल्लाबोल

Maharashtra Politics : काश्मिरमध्ये अजूनही निवडणुका का घेतल्या जात नाही, असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
J.P. Nadda and Uddhav Thackeray
J.P. Nadda and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर टीका करीत त्यांची खिल्ली उडवली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यांचे कारंजे उडाले. ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ठाकरे बोलत होते.

जे.पी. नड्डा यांनी ओडिशामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नड्डा यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, "उद्धव ठाकरे बोलले की यांचा 'नड्डा' सुटतो," असे ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

J.P. Nadda and Uddhav Thackeray
Ashadhi Wari 2023 : शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय..

शुक्रवारी पाटण्यात विरोधीपक्षांची बैठक आहे. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी चर्चा केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

"मी मुफ्तींचा बाजूला मुद्दाम बसलो होतो. मुफ्तींना मोदींनी ३७० कलम हटविणार नाही, असे वचन दिले होते. त्यामुळे मुफ्ती यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. पण मोदींनी ते आश्वासन पाळलं नाही. ३७० कलम त्यांनी हटवलं. मिळेल तिथं खा, ही आमची परंपरा नाही," अशा शब्दात ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं. काश्मिरमध्ये अजूनही निवडणुका का घेतल्या जात नाही, असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

J.P. Nadda and Uddhav Thackeray
BRS Entry in Maharashtra Politics : मोठी बातमी : BRS ने महाराष्ट्रात खातं उघडलं ; मराठवाड्यात..

मुफ्तींच्या शेजारी बसल्याने ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ठाकरेंनी सुनावलं. यावेळी ठाकरेंनी मुफ्तींसोबतचे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे फोटो दाखवले. ठाकरे म्हणाले, "हे भाजपचे मुस्लिम प्रेम आहे. हा भाजप पक्ष नसून 'भाडोत्री' पक्ष आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या या टीकेवर पलटवार करताना खासदार संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या शेजारी मेहबुबा मुफ्ती बसले म्हणून काल म्हणे, फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. फडणवीसांना इतकंच सांगायचं आहे की, "काश्मीर हा हिंदूस्थानच्या भूमीचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घ्या. बाकी, तुम्हाला स्वतःच मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवल्याचा अनुभव आहे. मेहबूबा मुफ्तींच्या सरकारमध्ये तुम्हीच सोबत होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला तर स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते, त्यामुळे टीका करताना ती जरा जपून करा, असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com