Priyanka Chaturvedi News : ठाकरेंनी दिलेलं चॅलेंज, राऊतांच्या अनुपस्थितीत प्रियांका चुतर्वेदींनी लढविला किल्ला; उपसभापतींना ‘त्या’ मुद्दयावर करावा लागला खुलासा

Shiv Sena UBT MP speech : सभागृहात संजय राऊत असल्यानंतर ते आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढतात. आज प्रियांका चतुर्वेदी यांनी राऊतांच्या अनुपस्थित राज्यसभेत किल्ला लढविला
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Parliament winter session : संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे मातरमवरून सरकारला घेरले. राज्यसभेत खासदारांनी वंदे मातरम, जय हिंद सारख्या घोषणा देऊ नयेत, अशा सूचना सचिवालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यावरून ठाकरे चांगलेच संतापले होते. आमचे दोन खासदार खणखणीत आवाजात वंदे मातरम म्हणतील. दम असेल तर त्यांचे निलंबन करून दाखवा, असा इशाराच ठाकरेंनी दिला होता.

ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर योगायोगाने संसदेत वंदे मातरमवर चर्चा झाली. लोकसभेत ही चर्चा पूर्ण झाली असून आज राज्यसभेतही झाली. ठाकरेंच्या सेनेच्या खासदार प्रियांका गांधी यांनी या चर्चेत सहभागी घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते कामकाजात सहभागी झालेले नाहीत.

सभागृहात संजय राऊत असल्यानंतर ते आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढतात. आज प्रियांका चतुर्वेदी यांनी राऊतांच्या अनुपस्थित राज्यसभेत किल्ला लढविला. राज्यसभा सचिवालयाच्या नोटिफिकेशनचा उल्लेख करत प्रियांका यांनी भाजपला घेरले.

Priyanka Chaturvedi
Amit Shah News : काँग्रेसच्या आव्हानानंतर शहांनी काही तासांतच दिली ‘त्या’ नेत्यांची यादी; 9 घटनांचा उल्लेख अन् केली बोलती बंद

भाजप वंदे मातरमवर चर्चा करणार असल्याचे समजल्यानंतर मी हैराण झाले. हे तेच भाजपचे सरकार आहे, ज्यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन काढले होते, त्यामध्ये इथले सदस्य वंदे मातरम, जय हिंदची घोषणा देऊ शकत नाहीत, असे म्हटले होते. यापेक्षा मोठा राष्ट्रद्रोह, राष्ट्रविरोधी विचार असूच शकत नाही. त्यामुळेच आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने सभापतींना हे नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली होती, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

चतुर्वेदी यांच्या विधानावर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच उपसभापती हरिवंश यांनीही त्यावर आक्षेप नोंदविला. प्रियांका चतुर्वेदी पुढे बोलताना म्हणाल्या, सीमेवरील जवान अतिरेक्यांशी लढताना वंदे मातरमधील दोन कडवी हटवली, हे पाहत नाहीत, ते वंदे मातरम म्हणत लढतात. वंदे मातरमच्या नावाखाली सुरू असलेले ध्रुवीकरण भाजपने थांबवावे.

Priyanka Chaturvedi
Election Commission : अधिवेशन सुरू असतानाच निवडणूक आयोग 'एक्स्पोज'; मतदान कार्डांबाबत धक्कादायक माहिती उघड

दरम्यान, प्रियांका यांचे भाषण संपल्यानंतर उपसभापतींनी त्या नोटिफिकेशनवर खुलासा केला. हे नोटिफिकेशन जुनेच असल्याचे त्यांनी आधी सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर तेव्हाच्या सभापतींना भाषणादरम्यान अशा घोषणा दिल्या जाऊ नयेत, सभागृहाची मर्यादा पाळावी, याअनुषंगाने त्यावेळी सुचना करण्यात आल्याचे उपभापतींनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com