‘एनडीए’ नेत्यांच्या पंक्तीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान

उद्धव ठाकरे यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत लंच डिप्लोमसी
Amit saha, UddhavThackeray, Nitishkumar,ShivrajSinh Chouhan
Amit saha, UddhavThackeray, Nitishkumar,ShivrajSinh ChouhanSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : नक्षलग्रस्ताच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २६ सप्टेंबर) नवी दिल्लीत जाऊन हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजनही केले. या वेळी ठाकरे हे अमित शहांच्या उजव्या हाताला बसले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपसह इतर पक्षाचे नेते उपस्थित होते. (Uddhav Thackeray's lunch diplomacy with Amit Shah in Delhi)

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत आयेाजित करण्यात आली होती. त्या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित हेाते. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना करायच्या याबाबत या बैठकीत चर्चा झाली

Amit saha, UddhavThackeray, Nitishkumar,ShivrajSinh Chouhan
...तर शिवाजीराव आढळराव पाटील आज लोकसभेत असते!

या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही मागण्या मांडल्या आहेत. दुर्गम भागात नवीन पोलिस चौक्या उभारणे, नक्षलग्रस्त भागात मोबाईल मनोरे उभारणे, तेथील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नवीन शाळांची बांधणे करणे व इतर गोष्टींसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत केली. त्याबाबचे सादरीकरणही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले.

दरम्यान, या बैठकीनंतर सहभागी मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेवणही घेतलं. या लंच डिप्लोमसी वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शहा यांच्या अगदी उजव्या हाताला बसले होते. त्या टेबलावर एनडीएतील जुन्या मित्रांपैकी एक असलेल्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उपस्थित होते. टेबलावरील ते चित्र पाहून एनडीएची आठवण ताजी झाली. एकेकाळी एनडीएमध्ये एकत्र असलेल्या या नेत्यांच्या पक्षांनी (नीतीशकुमार वगळता) भाजपची साथ सोडून वेगळी वाट धरली आहे. एनडीएचा संस्थापक असलेले शिवसेना आणि राष्ट्रीय अकली दल आज भाजपच्या विरोधात आहेत. मात्र, शहा यांच्यासेाबतच्या लंच डिप्लोमसीच्या वेळी यातील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानाचे मान मिळाले हेाते. त्याची चर्चा राज्यात चांगलीच रंगली आहे.

Amit saha, UddhavThackeray, Nitishkumar,ShivrajSinh Chouhan
पदांचा उपयोग नाही, म्हणून भाजप खासदाराने दिला राजीनामा

दरम्यान, महाविकास आघाडी असलेले उद्धव ठाकरे हे अधूनमधून दोन्ही काँग्रेसला धक्के देत असतात. मागच्या दिल्लीच्या दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्धा तास गुफ्तगू केले होते. त्याचीही चर्चा अनेक दिवस राज्यात होत होती. त्यानंतर आज शहा यांच्या टेबलावर ठाकरेंना मान मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे पाहत एकत्र आलो तर भावी सहकारी असे वक्तव्य केले हेाते. अशा वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चालेले आहे, याची चर्चा अधूनमधून होत असते. आता भाजपचे भावी सहकारी शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरे होणार का, असा प्रश्न आजच्या लंच डिप्लोमसीनंतर विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com