बोरीस जॉन्सन म्हणतात, मला सचिन अन् अमिताभ बच्चन असल्यासारखं वाटतंय!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे भारताच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी गुजरातमधील अनेक ठिकाणांना भेट दिली.
Boris Johnson, Narendra Modi
Boris Johnson, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) हे भारताच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी गुजरातमधील (Gujarat) अनेक ठिकाणांना भेट दिली. भारतात झालेलं स्वागत पाहून बोरीस जॉन्सन भारावून गेले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांना मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण झाली.

बोरीस जॉन्सन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले. ते म्हणाले, माझं भव्य स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचे आभार मानतो. मला भारतात आल्यानंतर सचिन तेंडूलकर असल्यासारखं आणि ठिकठिकाणी लागलेली होर्डिंग पाहून अमिताभ बच्चन असल्यासारखं वाटलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान मोदींचा उल्लेख त्यांनी 'खास दोस्त' असा उल्लेख केला.

Boris Johnson, Narendra Modi
राजकारण तापलं; पोलिसांनी राणा दाम्पत्याचा ठावठिकाणा शोधला अन् थेट दिला इशारा

बोरीस जॉन्सन यांचा पहिला दिवस गुजरातमध्ये गेला. याठिकाणी त्यांनी साबरमती आश्रमासह अनेक ठिकाणांनाही भेटी दिल्या. शुक्रवारी दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. तसेच पंतप्रधान मोदी व जॉन्सन या दोन नेत्यांनीही चर्चा केली. त्यानंतर दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदही घेतली. यावेळी जॉन्सन यांनी भारतात झालेल्या स्वागताचं कौतूक केलं.

मी अशाप्रकारचं स्वागत जगात कधीच अनुभवलं नाही. तुमचं (पंतप्रधान मोदी) राज्य पाहून मी भारावून गेलो, असंही ते म्हणाले. मुक्त व्यापारासाठीचा नवी करार दिवाळीपर्यंत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहे. भारताने काही उत्पादनांच्या किंमती कमी केल्याचे स्वागत आहे. आम्हीही तसा निर्णय घेऊ. आरोग्य सेवेतही दोन्ही देशांचे सहकार्य राहील, असं त्यांनी स्पष्ट केले.

Boris Johnson, Narendra Modi
महाराष्ट्र नव्हे देशभरातच कोळशाची टंचाई; ही आहेत तीन प्रमुख कारणं...

पंतप्रधान मोदी यांनीही खुल्या व्यापार करारावर भाष्य केले. वर्षअखेरीस हा करार होऊ शकेल. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मुक्त व्यापार कराराप्रमाणे हा करार असेल. संरक्षण क्षेत्रामध्ये उत्पादन घेण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचेही पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. आत्मनिर्भर भारत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या या पावलाचे स्वागत आहे. भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनमध्ये सहभागी होण्यासाठीही आम्ही त्यांना आमंत्रित करतो, असं मोदींनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com